नायलॉन मांजावर बंदी घाला
By Admin | Updated: December 22, 2015 23:53 IST2015-12-22T23:48:20+5:302015-12-22T23:53:35+5:30
युवासेनेची मागणी

नायलॉन मांजावर बंदी घाला
नाशिक : शहरात सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री केली जात असल्याने पक्ष्यांसह मानवाच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी प्रशासनाकडून केली जात असलेली कारवाई कुचकामी स्वरूपाची असल्याने मांजा विक्रेत्यांना बळ मिळत असल्याचा आरोप करीत नायलॉन मांजावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी युवासेनेकडून करण्यात आली. याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
गेल्यावर्षी नायलॉन मांजामुळे अंबड वसाहतीतील एका कामगाराचा मृत्यू झाला होता. तर हजारोंच्या संख्येने पक्ष्यांवर या मांजामुळे संक्रांत आली होती. मकरसंक्रांतीमध्ये पतंग उडविण्याला प्राधान्य दिले जात असल्याने या काळात शहरात सर्वाधिक मांजा विक्री केली जात आहे. प्रशासन थातूर-मातूर कारवाया करीत असल्यानेच मांजा विक्रीवरील बंदीला हडताळ फासला जात असल्याने यावर्षी गंभीरपणे बंदीबाबतची कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा समन्वयक सचिन बांडे, उमेश चव्हाण, अमोल सूर्यवंशी, नाना काळे, जयदीप सूर्यवंशी, गोकुळ मते, अंकुश राऊत, संदीप पोटे, गौरव देशमुख आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)