शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
3
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
4
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
5
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
6
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
7
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
8
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
9
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
10
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
11
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
12
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
13
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
14
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
15
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
16
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
17
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
18
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
19
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
20
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक विभागातील अभयारण्यांमध्ये प्रवेश बंदी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 19:21 IST

सर्व भागात वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी व्यक्तिश: गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह पर्यटन बंदीकरीता विशेष पथक नेमण्यात यावे.

ठळक मुद्दे१ मेपासून पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी कायम

नाशिक : राज्यात सातत्याने कोरोनाच्या रु ग्णांत वाढ होत असल्याने दक्षता म्हणून राखीव वनक्षेत्र व अभयारण्यांचे दरवाजे पर्यटक व अभ्यासकांसाठी मार्चच्या पंधरवड्यापासून बंद करण्यात आले आहेत. नाशिकचे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनीही नाशिक विभागातील सर्व अभयारण्ये, वनक्षेत्रांच्या परिसरात प्रवेशास मज्जाव कायम ठेवल आहे. ३०एप्रिल रोजी मागील आदेश संपल्यानंतर पुन्हा १ मेपासून पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी कायम ठेवण्यात येणार असल्याचे पत्रक जारी केले आहे.वन्यजीव विभागाने करोनामुळे निफाड तालुक्यातील प्रसिध्द नांदूरमध्यमेश्वर, धुळे जिल्ह्यातील अनेर डॅम, जळगावमधील यावल आणि अहमदनगर मधील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात जाता येणार नसल्याचे पत्रकात म्हटले आहे. या भागात सातत्याने वनविभाग प्रादेशिक व वन्यजीव विभागाचे पथक गस्तीवर आहेत.वन्यजीव विभागाने नाशिक परिक्षेत्रातील संपूर्ण वनक्षेत्रात पर्यटकांसह अभ्यासकांना जाण्यास मज्जाव केला आहे. शासनाच्या आदेशानुसार कोणत्याही ठिकाणी गर्दी न होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे अभयारण्ये, वनक्षेत्रात पर्यटनास बंदी घातली असून, या सर्व भागात वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी व्यक्तिश: गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह पर्यटन बंदीकरीता विशेष पथक नेमण्यात यावे. तसेच पर्यटकांना वनक्षेत्रात न जाण्याचे आवाहन करत अभयारण्यांच्या हद्दीत असलेल्या गावांमध्ये जनजागृती करत गोरगरीब शेतमजूर, आदिवासी वर्गाला जीवनावश्यक वस्तूंची मदतदेखील करण्याचे आवाहन अंजनकर यांनी केले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसwildlifeवन्यजीवnandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वरbirds sanctuaryपक्षी अभयारण्यforest departmentवनविभाग