‘कमवा आणि शिका’ योजनेला अडसर
By Admin | Updated: April 27, 2016 00:03 IST2016-04-26T23:35:51+5:302016-04-27T00:03:41+5:30
सोमेश दासगुप्ता : मुक्त विद्यापीठाच्या योजनेवर पाणी

‘कमवा आणि शिका’ योजनेला अडसर
सातपूर : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व निपम यांच्या संयुक्त विद्यमाने कमवा आणि शिका ही योजना कायदेशीर अडचणींमुळे नाशिकला राबविता येणार नाही. मात्र निपमचे मुख्यालय असलेल्या कोलकाता येथे या योजनेसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती निपमचे राष्ट्रीय अध्यक्ष सोमेश दासगुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक ही अतिशय महत्त्वाची शाखा आहे. नाशिक शाखा आणि मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शिका आणि कमवा हा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव होता. याकडे लक्ष वेधले असता संस्थेच्या नावात राष्ट्रीय (नॅशनल) नाव असल्याने कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे. संस्थेचे कार्य संपूर्ण भारतात चालते, तर देशात १४ मुक्त विद्यापीठे असून, त्या त्या राज्यात कायदे वेगवेगळे आहेत. त्यामुळे नाशिकला हा प्रकल्प शक्य नाही, परंतु संस्थेचे मुख्यालय असलेले कोलकाता येथे हा प्रकल्प राबविणे शक्य असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. कारण तेथील मुक्त विद्यपीठाचे कुलगुरू हे निपमचे माजी अध्यक्ष असल्याने या प्रकल्पाचा विचार होऊ शकतो, असे दासगुप्ता यांनी स्पष्ट केले. यावेळी निपम नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र चौबळ, श्रीधर व्यवहारे, डॉ.उदय खरोटे, प्रकाश बारी, एस. एस. खैरनार, सुधीर पाटील, राजेंद्र रसाळ, राजाराम कासार आदिंसह संचालक उपस्थित होते. (वार्ताहर)