बलसागर भारत होवो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 00:20 IST2020-08-16T21:51:36+5:302020-08-17T00:20:19+5:30
नाशिक : जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्थाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले.

त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे ध्वजारोहण करताना नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर. समवेत आमदार हिरामण खोसकर, माधवी भुजंग, मुख्याधिकारी संजय जाधव, स्वप्निल शेलार, समीर पाटणकर, अभिजित इनामदार आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्थाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले.
त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर : तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने आमदार हिरामण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या प्रांगणात सभापती मोतीराम दिवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
नगर परिषदेत आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी संजय जाधव, उपनगराध्यक्ष माधवी भुजंग, स्वप्निल शेलार, समीर पाटणकर, कैलास चोथे, मंगला आराधी, कल्पना लहांगे, सागर उजे, दीपक गिते आदी उपस्थित होते.
मुख्य शासकीय सोहळा तहसील कार्यालयात संपन्न झाला. यावेळी आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार दीपक गिरासे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी रामकिसन राठोड, नायब तहसीलदार (प्रशासन) के. आर. जाधव,
नूतन विद्यालय, खडकमाळेगाव
निफाड : तालुक्यातील नूतन माध्यमिक विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष देवराम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक योगेश शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष सुकदेव रायते, सरचिटणीस दत्तात्रय चव्हाण, मुख्याध्यापिका एम.बी.रायते आदी उपस्थित होते.सिन्नर महाविद्यालयसिन्नर : सिन्नर महाविद्यालयात प्राचार्य डॉ. पी .व्ही. रसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य घनश्याम देशमुख, डी. एड. कॉलेजचे प्राचार्य भामरे, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, डॉ. डी. एम. जाधव, शकुंतला गायकवाड, प्रा. आर. टी. गुरुळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले. सूत्रसंचालन प्रा. योगेश भारस्कर यांनी केले. आभार क्रीडा संचालक प्रा. कांदाळकर एल. एस. यांनी मानले. यावेळी एनसीसी प्रमुख लेफ्टनंट डॉ. उपेंद्र पठाडे, प्रा. पी. एम. खैरनार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
धामणगाव विद्यालय
सवर्तीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील जनता सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक विद्यालयात पोपट गुंजाळ यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करण्यात आले. पंढरीनाथ सहारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य एस. डी. आहिरे यांनी केले.
यावेळी प्रतिष्ठित नागरिक तसेच तरुण मित्रमंडळ, प्राथमिक आश्रमशाळा, माध्यमिक आश्रमशाळा व माध्यमिक विद्यालयाचे सर्व कमर्चारी उपस्थित होते.
.शेवगेडांग ग्रामपंचायत
इगतपुरी : तालुक्यातील शेवगेडांग येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच साहेबराव सोमा खंडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक एस.एस. मासाळ, उपसरपंच कमल पोरजे, पंचायत समिती सदस्य कौसाबाई करवंदे, ग्रामपंचायत सदस्य लीलाबाई भरीत, शोभा पोरजे, काशीनाथ मांगटे, भीमराव चहाळे, संदीप भरीत, हिराबाई भस्मे, सुनीता चहाळे, लता भरीत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोनामुळे शासकीय अध्यादेशानुसार नियमांचे पालन करूनच कार्यक्रम घेण्यात आले.