पावसाने दडी मारल्याने बळीराजा द्विधावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 06:51 PM2020-06-23T18:51:46+5:302020-06-23T18:56:21+5:30

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अनेक गावांत सुरु वातीला चांगला पाऊस झाल्याने बळीराजांच्या चेहऱ्यावर समाधान होते. त्यामुळे खरीप हंगामासाठी सज्ज होऊन बळीराजा मशागत करून पेरणीला लागला; परंतु नंतर पावसाने दडी मारल्याने बळीराजांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. रब्बी हंगामातील आलेला कटू अनुभव बाजूला सारून बळीराजाने यंदाच्या खरीप हंगामासाठी आपली कंबर कसली आहे. सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे लखमापूर, म्हेळुसके, परमोरी, अवनखेड, करंजवण, ओझे, ओझरखेड, दहेगाव वागळुद आदी भागातील शेतकरीवर्ग खरीप हंगामासाठी सज्ज झाला.

Baliraja is in a dilemma due to heavy rains | पावसाने दडी मारल्याने बळीराजा द्विधावस्थेत

पावसाने दडी मारल्याने बळीराजा द्विधावस्थेत

googlenewsNext

मध्यंतरी थोडा पाऊस उघडल्याने बळीराजांच्या पेरण्या मध्यावर आल्या असताना पावसाने दडी मारल्याने बळीराजांच्या कल्पनाना फाटा निर्माण झाला
आहे. पेरण्या आटोपल्या असून, पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. कोरोना, अस्मानी, सुलतानी संकटांनी ग्रामीण भागातील जनता त्रासून गेली आहे. त्यात मोठ्या कष्टाने खरीपाची तयारी करून जास्त कसे उत्पन्न घेता येईल.यंदा सुरु वातीला चांगला पाऊस झाल्याने पाण्याची काळजी मिटली या आशेवर बळीराजाने सोयाबीन, भुईमूग, मका, भात, ज्वारी आदी बियाणे खरेदी करून पेरणी केली.पावसाने पाठ दाखवल्याने खरीप हंगामाचे भांडवल वाया जाते की काय याची भीती बळीराजाला वाटू लागली आहे. या परिस्थितीतही उधार- उसनवारी करून बियाणे, खते खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. परिसरात खरीप हंगामातील मका, सोयाबीन पिकांच्या लागवडी झाल्या आहेत. मक्याचे अंकुर उगवले असून, सोयाबीनच्या पेरण्याही झाल्या आहेत. मात्र, अद्याप सोयाबीन उगवले नसल्याने शेतकरी चिंतित आहे. आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने व वाढत्या उष्णतेने जमिनीची ओलही कमी होत चालल्याने मका, सोयाबीन पीक धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकºयांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.

Web Title: Baliraja is in a dilemma due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.