शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवसेनेत धुमश्चक्री !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 16:10 IST

नाशिक : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर सेनेच्या उप महानगर प्रमुखाने त्याच्या साथीदारासह शिवसैनिकाला भर रस्त्यात बडदल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. विशेष म्हणजे कार्यालयाच्या बाहेर ही हाणामारी सुरू असताना सेनेच्या एकाही पदाधिका-याने त्यात हस्तक्षेप करण्याचा साधा प्रयत्नही न केल्याबद्दल आश्चर्य ...

ठळक मुद्देसेना भवनासमोर प्रकार : पदाधिकाºयाने सैनिकाला बदडले

नाशिक : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर सेनेच्या उप महानगर प्रमुखाने त्याच्या साथीदारासह शिवसैनिकाला भर रस्त्यात बडदल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. विशेष म्हणजे कार्यालयाच्या बाहेर ही हाणामारी सुरू असताना सेनेच्या एकाही पदाधिका-याने त्यात हस्तक्षेप करण्याचा साधा प्रयत्नही न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असून, ज्याला बदडले त्याच्या विषयी सेनेकडे यापुर्वीच तक्रारींचा पाऊस असल्याने जे झाले ते योग्यच असे म्हणत सा-यांनीच या वादापासून स्वत:ला दूर करून घेतले आहे.जिल्हा शिवसेनेच्यावतीने शिवसेना कार्यालयात सकाळी अकरा वाजता बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमास जिल्हा प्रमुख, महानगरप्रमुखासह प्रमुख पदाधिकारी, नगरसेवकांसह शिवसैनिकही मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व जण कार्यालयातून बाहेर पडत असतानाच उपमहानगर प्रमुख शरद देवरे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता राजेंद्र नानकर याच्याशी नजरानजर झाली. गेल्या काही महिन्यांपासून नानकर हा देवरे यांनी स्थापन केलेल्या रोजगार संस्थेविषयीची माहिती शासकीय कार्यालयाकडून माहिती अधिकार कायद्यान्वये मागत होता. यापुर्वीही नानकर यांनी अनेक शासकीय अधिका-यांची वैयक्तीक माहिती मागविल्याचे प्रकरणे असून, लोकशाही दिन व भ्रष्टाचार निर्मुलन तक्रार दिनात त्याने अधिकाºयांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. अशा तक्रारी करून तो अधिका-यांना त्रास देत असल्याबाबत सेनेकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्याने देवरे यांनी त्याला जाब विचारला असता त्यातून धुमश्चक्री उडाली व देवरे यांनी नानकर यांना भररस्त्याच बदडण्यास सुरूवात केली. यावेळी देवरे यांच्या सहका-यांनीही नानकर याला बेदम मारहाण केली. शिवसेना कार्यालयाबाहेर घडत असलेल्या या प्रकारात एकही शिवसैनिक मारामारी सोडविण्यास पुढे धजावला नाही, अखेर मारहाणीत चांगलाच मार बसलेल्या नानकर याने आपली दुचाकी तेथेच सोडून पळ काढला. हा सारा प्रकार घडत असताना शिवसेना जिल्हा प्रमुख, महानगरप्रमुख यांनी बाहेर येण्याचे सौजन्यही दाखविले नाही. मात्र बाळासाहेबांच्या स्मृतीदिनीच हा प्रकार घडल्याने त्याची जोरदार चर्चा होत आहे.

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेPoliceपोलिस