बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:21 IST2021-08-17T04:21:01+5:302021-08-17T04:21:01+5:30
यावेळी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी देशाची एकता व अखंडतेचे महत्त्व सांगत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ...

बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१
यावेळी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी देशाची एकता व अखंडतेचे महत्त्व सांगत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता महत्त्वाची असल्याचे सांगितले. याप्रसंगी नगरसेविका हर्षा बडगुजर, नगरसेवक श्यामकुमार साबळे तसेच ज्येष्ठ नागरिक सोनवणे काका, जगन्नाथ कुर्हे, निकम मनपा हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरोडे, दत्ता बुनगे, मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते, विनोद मेणे, किसन काळे, भगवान काकळुते, रूपाली ठोक, वंदना आरसुळे, प्रमिला पवार, कविता ओचानी, शैलजा भागवत, योगीता खैरे, सुवर्णा थोरात, प्रणीता ओतुरकर, शोभा मगर, बच्छाव मॅडम, प्रवीण गायकवाड, नवनाथ वारुंगसे, गणेश काजळे आदी उपस्थित होते.
प्रस्ताविक बाळासाहेब सातपुते यांनी, सूत्रसंचलन विनोद मेणे यांनी तर आभार किसन काळे यांनी मानले.
चौकट..
कोरोनायोद्धा म्हणून लोकप्रतिनिधी, समाजसेवक, परिसरातील डॉ. किरण बिरारी, डॉ. मंडलेचा, अक्षय घोडके, आरोग्य कर्मचारी, पोलीस, शिक्षक यांच्याप्रति शाळेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करीत त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
फोटो ओळीं:
बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१ मध्ये ध्वजारोहणप्रसंगी नगरसेवक सुधाकर बडगुजर, श्यामकुमार साबळे, हर्षा बडगुजर, बाळासाहेब सातपुते, शिरोडे आदी.
160821\16nsk_54_16082021_13.jpg
बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र.७१