डोंगरगावच्या उपसरपंचपदी बाळासाहेब सोमासे अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:15 IST2020-01-29T22:21:35+5:302020-01-30T00:15:22+5:30
डोंगरगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बाळासाहेब सोमासे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले होते. त्यात उपसरपंचाचाही समावेश होता. त्यामुळे उपसरपंच पद रिक्त होते.

डोंगरगावचे नवनिर्वाचित उपसरपंच बाळासाहेब सोमासे यांचा सत्कार करताना उषाबाई रोठे, सुरेखा रोठे, गोरखनाथ रोठे, ज्ञानेश्वर रोठे, दत्तात्रय सोमासे, आसाराम पगारे आदी.
येवला : तालुक्यातील डोंगरगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बाळासाहेब सोमासे यांची बिनविरोध निवड झाली.
ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले होते. त्यात उपसरपंचाचाही समावेश होता. त्यामुळे उपसरपंच पद रिक्त होते.
सरपंच उषाबाई रोठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उपसरपंचदी सोमासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी सदस्य निवृत्ती अहिरे, सरला पवार उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक आर. एन. ठोंबरे यांनी काम पाहिले. यावेळी एकनाथ महाराज सोमासे, सोसायटी संचालक दत्तात्रय सोमासे, गोरखनाथ रोठे, ज्ञानेश्वर रोठे, जगन सोमासे, किशोर कदम, अण्णासाहेब सोमासे, आसाराम पगारे, माजी उपसरपंच विजय मोहन, पोपट सोमासे, भगवान रोठे, गणेश सोमासे आदी उपस्थित होते.