शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

बाळासाहेब सानप यांना तुकाराम मुंढे यांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 01:47 IST

भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी पंचवटीत गणेशवाडी येथे विद्याभवन इमारतीचे बांधकाम बेकायदा असल्याच्या न्यायालयीन तक्रारींच्या आधारे सदर मिळकत ताब्यात घेण्याचे आदेश आयुक्ततुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच यासंदर्भात कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पंचवटी : भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी पंचवटीत गणेशवाडी येथे विद्याभवन इमारतीचे बांधकाम बेकायदा असल्याच्या न्यायालयीन तक्रारींच्या आधारे सदर मिळकत ताब्यात घेण्याचे आदेश आयुक्ततुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच यासंदर्भात कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  भाजपा आणि आयुक्त मुंढे यांच्यातील संघर्ष यामुळे टोकाला पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंचवटीतील सामाजिक कार्यकर्ता सचिन दफ्तरे यांनी यासंदर्भात महापालिकेकडे तक्रार केली आहे. दफ्तरे यांनी या आधीही या मिळकतीबाबत महापालिकेकडे वेळोवेळी तक्रारी केल्या असून, त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वाघाडी नदीकाठी असलेली ही इमारत महापालिकेने भराव टाकून बांधलेली आहे. त्याचप्रमाणे त्याचा बेकायदेशीर वापर होत असल्याची तक्रार असून, त्यावर कारवाईसाठी त्यांनी महापलिकेला पत्र देऊनही कार्यवाही होत नसल्याने आता प्रशासनाने सत्वर कार्यवाही करून अहवाल त्वरित द्यावा म्हणजे न्यायालयात तो सादर करता येईल, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उपआयुक्तांना ही मिळकत ताब्यात घेण्यासाठी सांगितले त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांना आदेश दिले असून, कार्यवाही करण्यास सांगितले आहे.  विभागीय अधिकाºयांनी सानप यांच्या श्रीराम वाचनालयाला नोटीस बजावली असून, सात दिवसांत खुलासा मागवला होता. त्यानंतर आता कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. सध्या भाजपा आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात संघर्ष सुरू आहे.भाजपाच्या आमदारांनी सुचवलेली कामे करण्याऐवजी आयुक्तांनी हा निधी पाण्याच्या कामासाठी वापरण्याची तयारी केल्याने नाराज काही नाराज आमदार थेट मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. आता त्यात या वादाची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.विद्याभवन या इमारतीत गेल्या सतरा ते अठरा वर्षांपासून अभ्यासिका आणि वाचनालय सुरू आहे. त्याचा परिसरातील शेकडो विद्यार्थी लाभ घेत आहेत. त्यातून अनेक विद्यार्थी उपयुक्त शिक्षण घेऊन करिअर घडवित आहेत. सदरच्या मिळकतीसंदर्भात कायदेशीर करारही करण्यात आला आहे.  - आमदार बाळासाहेब सानप

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढे