शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

बाळासाहेब सानप यांनी ‘घड्याळ’ उतरवून मनगटावर बांधले ‘शिवबंधन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 14:03 IST

निवडणूक प्रचार कालावधीत सानप यांची खासदार संजय राऊत यांनी घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली होती. या भेटीमागे कदाचित शिवसेना प्रवेशाचे गुपित असावे, असे आता बोलले जात आहे.

ठळक मुद्देखरी लढत सानपविरुद्ध ढिकले अशीच झाली.भाजपचे ढिकले बाजीगर ठरलेथेट मातोश्रीवर जाऊन मनगटावर शिवबंधन बांधले

नाशिक : पुर्व विधानसभा मतदार संघातून भाजपने तिकिट कापल्यानंतर थेट राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधून निवडणूक रिंगणात उतरून बंडखोरी करणारे बाळासाहेब सानप यांना पराभव पत्कारावा लागला. यानंतर अवघ्या तीन दिवसांतच सानप यांनी मनगटाचे ‘घड्याळ’ उतरवून थेट मातोश्रीवर जाऊन मनगटावर शिवबंधन बांधले. त्यामुळे निवडणूक प्रचार कालावधीत सानप यांची खासदार संजय राऊत यांनी घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली होती. या भेटीमागे कदाचित शिवसेना प्रवेशाचे गुपित असावे, असे आता बोलले जात आहे.पूर्व मतदारसंघात यंदा भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ सरळ दुरंगी लढत होत झाली. दोन्ही तुल्यबळ उमेदवार असले तरी, या मतदारसंघात ऐनवेळी घडलेल्या राजकीय घटना, घडामोडी पाहता, त्यात भाजपचे ढिकले बाजीगर ठरले. या मतदारसंघात ‘टफ फाईट’ पहावयास मिळाली. ढिकले यांना ८६ हजार ३०४ मते मिळाल्याने ते विजयी झाले तर सानप यांना ७४ हजार ३०४ मते मिळाली.निवडणूक जाहीर झाल्यापासून पूर्व मतदारसंघात अनेक राजकीय घटना घडामोडी घडल्या. भाजपचे आमदार व शहराध्यक्ष असलेल्या बाळासाहेब सानप यांना पक्षाने उमेदवारी देऊ नये यासाठी सानप विरोधकांनी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या, तर सानप समर्थकांनीही उमेदवारी मिळावी यासाठी शक्तिप्रदर्शन केले; परंतु पक्षाने अखेरच्या दिवसापर्यंत सानप यांना उमेदवारी दिली नाही, उलटपक्ष मनसेकडून इच्छुक असलेले राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज सानप यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधून उमेदवारी अर्ज दाखल क रत निवडणूक लढविली; मात्र त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली नाही.या मतदारसंघातून मनसेने माजी महापौर अशोक मुर्तडक यांना उमेदवारी दिली. त्यांनी नामांकनही भरले; परंतु माघारीच्या दिवशी नाट्यमय घडामोडीत मुर्तडक यांनी माघार घेतली. त्यांच्या माघारीने कोणाला राजकीय लाभ होईल हे नव्याने सांगण्याची त्यावेळीदेखील गरज नव्हती. मात्र याचवेळी कॉँग्रेस आघाडीतच बिघाडी झाली. जागावाटपात पूर्वची जागा कॉँग्रेसच्या वाट्याला असल्याने ही जागा कॉँग्रेसने कवाडे गटाला सोडलेली असताना राष्ट्रवादीने सानप यांना उमेदवारी देऊन बिघाडी केली; मात्र मतदारसंघात भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र निर्माण होत असताना कवाडे गटाचे गणेश उन्हवणे यांनी माघार घ्यावी यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले गेले. त्यात यश मिळू शकले नाही. त्यामुळे वरकरणी या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र असले तरी, खरी लढत सानपविरुद्ध ढिकले अशीच झाली.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाBalasaheb Sanapबाळासाहेब सानपSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेGirish Mahajanगिरीश महाजन