बालाजी मंदिर गर्भगृहात अक्षय तृतीयेला भाविकांना मुक्त प्रवेश

By Admin | Updated: May 8, 2016 00:26 IST2016-05-07T22:53:51+5:302016-05-08T00:26:54+5:30

बालाजी मंदिर गर्भगृहात अक्षय तृतीयेला भाविकांना मुक्त प्रवेश

Balaji Temple In the sanctum sanctorum, devotees of Akshay Tritiya free admission | बालाजी मंदिर गर्भगृहात अक्षय तृतीयेला भाविकांना मुक्त प्रवेश

बालाजी मंदिर गर्भगृहात अक्षय तृतीयेला भाविकांना मुक्त प्रवेश

 नाशिक : शंकराचार्य डॉ. कूर्तकोटी यांच्या विचार व कृतीला अनुसरून समाजातील समत्व रुजविण्यासाठी यंदाही अक्षय तृतीयेला गंगापूर धबधब्याजवळील बालाजी मंदिर गर्भगृहात भाविकांना मुक्त प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष आनंद जोशी यांनी दिली.
या उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून ९ मे रोजी सकाळच्या अभिषेक व आरतीनंतर सायंकाळी ७ पर्यंत भाविकांना गर्भगृहातून बालाजीचे दर्शन घेता येणार आहे. वर्षभरात दर शुक्रवारी, एकादशी, ब्रह्मोत्सवातील १५ दिवस विविध अभिषेक व ज्यांनी वार्षिक दिनाची नोंदणी केली आहे, अशांनाच गर्भगृहात प्रवेश दिला जातो. जास्तीत जास्त भाविकांनी अक्षय तृतीयेच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिराचे व्यवस्थापक राजेंद्र जोशी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Balaji Temple In the sanctum sanctorum, devotees of Akshay Tritiya free admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.