शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

बालाजी कोट : पाण्याच्या हिटरकडे दुर्लक्षामुळे आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 21:52 IST

सराफ बाजारामागे सरस्वती चौकात असलेल्या पोळवाड्याच्या वरच्या मजल्यावरील खोलीमधून अचानकपणे मंगळवारी दुपारच्या सुमारास धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे परिसरातील रहिवाशांसह युवकांच्या लक्षात आले.

ठळक मुद्दे पाण्याच्या बादलीत सोडलेल्या हिटरकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पाणी प्रचंड तापले रस्ता अत्यंत अरुंद असल्यामुळे दोन्ही बंब अडकले.जवानांनी घरात जाऊन गॅस सिलिंडर बाहेर काढला.

नाशिक : सराफ बाजारातील बालाजी कोट परिसरातील एका तीन मजली जुन्या वाड्यातील पोळवाड्याच्या तिसऱ्या मजल्यावर राहणा-या नलिनी वामन पोळ यांच्या घरात अचानकपणे आग लागली. पाण्याच्या बादलीत सोडलेल्या हिटरकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पाणी प्रचंड तापले आणि बादलीतून बाहेर पडले यावेळी हिटरही जमिनीवर पडल्याने घरातील काही कपड्यांसह पुस्तकांनी पेट घेतला. धूर निघत असल्याचे परिसरातील युवकांच्या तत्काळ लक्षात आल्याने अनर्थ टळला.याबाबत अग्निशामक दलाकडून मिळालेली माहिती अशी, सराफ बाजारामागे सरस्वती चौकात असलेल्या पोळवाड्याच्या वरच्या मजल्यावरील खोलीमधून अचानकपणे मंगळवारी दुपारच्या सुमारास धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे परिसरातील रहिवाशांसह युवकांच्या लक्षात आले. घटनेची माहिती काही जागरूक नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला कळविली. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचेपर्यंत युवकांनी खोलीत धाव घेऊन सुखरूपपणे वयोवृद्ध नलिनी पोळ यांना खाली आणले आणि पाण्याच्या बादल्यांच्या सहाय्याने आग विझविण्यास सुरुवात केली. अग्निशामक दलाचा बंब जुने नाशिकमार्गे भद्रकालीतून सराफ बाजारात पोहचला; मात्र सरस्वती चौकाकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद असल्यामुळे दोन्ही बंब अडकले. आग लागलेल्या वाड्यापर्यंत बंब घेऊन जाणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर जवानांनी खाली उतरुन पाण्याचा होज ओढत वाड्याकडे नेला आणि पाण्याचा मारा सुरू केला. तापेर्यंत युवकांनी बादल्यांनी पाणी फेकून आग अधिक वाढू दिली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जवानांनी घरात जाऊन गॅस सिलिंडर बाहेर काढला. सिलिंडरही पुर्णपणे काळा झाला होता. आग लवकर विझल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली नाही. लाकडी वाडा असल्यामुळे आणि अरुंद गल्लीबोळाचे आव्हान मदतकार्यापुढे होते; मात्र सुदैवाने आगीने रौद्रावतार धारण केला नाही, त्यामुळे मोठे संकट टळले.

टॅग्स :fireआगNashikनाशिक