बालाजी मंदिरातील दानपेटी फोडून चोरी
By Admin | Updated: February 28, 2017 01:12 IST2017-02-28T01:11:50+5:302017-02-28T01:12:05+5:30
ओझर टाउनशिप : येथील गणपती मंदिर कॉम्प्लेक्समधील श्री बालाजी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने मंदिरात प्रवेश करून कपाटातील चार हजार रुपये चोरून नेले.

बालाजी मंदिरातील दानपेटी फोडून चोरी
ओझर टाउनशिप : येथील गणपती मंदिर कॉम्प्लेक्समधील श्री बालाजी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून व जाळीचे गज कापून आज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून कपाटातील चार हजार रुपये , दानपेटी फोडून दोन हजार रु पये असे एकूण सहा हजार रूपये चोरून नेले. सोमवारी दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
ओझर टाउनशिपमधील गणपती मंदिर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या श्री बालाजी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून जाळीचे गज कापून आज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून मंदिरातील कपाटात ठेवलेले चार हजार रु पयासह दानपेटी फोडून अंदाजे दोन हजार रूपये असे एकूण सहा हजार रूपये चोरून नेले असल्याची तक्र ार मंदिराचे शिवकुमार पुनिया गोरे पाटील यांनी नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी आज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान तपासकामी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. परंतु श्वानाने अर्धवट माग दाखविला. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलिस करीत आहेत. (वार्ताहर)