बहुजन समाज पार्टीची निदर्शने : महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात घोळ झाल्याचा आरोप

By Admin | Updated: March 13, 2017 01:53 IST2017-03-13T01:53:38+5:302017-03-13T01:53:51+5:30

प्रतीकात्मक मतदान यंत्रांचे दहन

Bahujan Samaj Party's demonstrations: The allegations of ruckus in Maharashtra, Uttar Pradesh | बहुजन समाज पार्टीची निदर्शने : महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात घोळ झाल्याचा आरोप

बहुजन समाज पार्टीची निदर्शने : महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात घोळ झाल्याचा आरोप

नाशिक : उत्तर प्रदेशात विधानसभा तर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजपा आणि निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात घोळ घातला आणि त्यातून भाजपाने विजय मिळवल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीने केला आहे. या घोळाचा निषेध म्हणून सीबीएसवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रतीकात्मक यंत्रांचे दहन करण्यात आले.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. त्यात भाजपाला यश मिळाले असून, ते संशयास्पद असल्याचा आरोप आहे. या यंत्रात भारतीय जनता पार्टी निवडून येईल, अशा पद्धतीचा प्रोग्रॅम तयार करण्यात आला आहे.
यासंदर्भातील तक्रारींकडे निवडणूक आयोगही डोळेझाक करीत आहे. तसेच गेल्याच महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतही असाच प्रकार घडला असल्याचा आरोप बसपाचे प्रदेश महासचिव शांताराम तायडे, नाशिक विभागाचे समन्वयक अरुण काळे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bahujan Samaj Party's demonstrations: The allegations of ruckus in Maharashtra, Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.