चतुर्मासानिमित्त भगूरला शोभायात्रा

By Admin | Updated: July 5, 2014 00:16 IST2014-07-04T23:59:29+5:302014-07-05T00:16:10+5:30

चतुर्मासानिमित्त भगूरला शोभायात्रा

Bagurala Shobhayatra celebrated by Chaturmasana | चतुर्मासानिमित्त भगूरला शोभायात्रा

चतुर्मासानिमित्त भगूरला शोभायात्रा

भगूर : श्री वर्धमान स्थानकवासी व जैन श्रावक संघाच्या वतीने आयोजित चतुर्मासानिमित्ताने आलेल्या जैन साध्वींची स्वागत शोभायात्रा काढण्यात आली होती. अनुपेक्षाजी म.सा., श्रुतीजी म.सा., रूतुप्रभाजी म.सा. यांचे रेल्वे गेटजवळ स्वागत करून गायकवाड गल्ली, मेनरोड, शिवाजी चौक मार्गे स्थानकात स्वागत शोभायात्रा काढण्यात आली होती. दररोज सकाळी ६ ते ७ पर्यंत प्रार्थना, ९ ते १० प्रवचन, दुपारी ३ ते ४ धार्मिक अध्ययन आदि कार्यक्रम होणार आहे. शोभायात्रेत संघपती शांतीलाल लुणावत, कांतीलाल नहार, शांतीलाल कोचरमुथा, प्रकाश सुराणा, प्रकाश नहार, प्रवीण नहार, राजेंद्र फुलफगर, मोहनलाल नहार, राजेंद्र सुराणा, नितीन टाटीया, विजय कोचरमुथा, शैलेश मुथा, मोहनलाल नाहाटा आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Bagurala Shobhayatra celebrated by Chaturmasana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.