बॅग कारखाना आगीत खाक

By Admin | Updated: March 2, 2015 00:06 IST2015-03-01T23:36:49+5:302015-03-02T00:06:26+5:30

सातपूरची घटना : एन. व्ही. आॅटोचे कोट्यवधींचे नुकसान

Bags factory fire | बॅग कारखाना आगीत खाक

बॅग कारखाना आगीत खाक

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील एऩ व्ही़ आॅटो स्पेअर्स प्रा़ लिमिटेड या बॅग बनविण्याच्या कारखान्यास शनिवारी (दि़ २८) मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली़ या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, अग्निशामक दलाच्या दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली़ जानेवारी महिन्यात अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्याला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते़
सिडको येथील उद्योजक व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कैलास अहिरे यांचा सातपूर औद्योगिक वसाहतीत एऩ व्ही़ आॅटो स्पेअर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचा बॅग बनविण्याचा कारखाना आहे़ शनिवारी (दि़२८) मध्यरात्रीच्या सुमारास या कारखान्यास अचानक आग लागून कामाच्या वस्तंूसह संपूर्ण कारखान्यातील एका बाजूचे युनिट पूर्णत: जळून खाक झाले़ या कारखान्याच्या एका बाजूस प्रेस पार्ट, मेटल फ्रेमचे कामकाज चालते, तर याच कारखान्याच्या दुसऱ्या बाजूला शॉप लगेजचे काम सुरू असते़
या कारखान्याच्या शॉप लगेजमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याची माहिती सुरक्षा रक्षकाने कंपनीमालक कैलास अहिरे यांना दिली़ ही आग इतकी भयानक होती की काही वेळातच कारखान्यातील लगेज शॉपमध्ये असणाऱ्या शंभराहून अधिक शिलाई मशिन्स, बॅग बनविण्यासाठी असलेला कोट्यवधी रुपयांच्या स्टॉकसह तयार असलेल्या बॅग जळून खाक झाल्या़ याबरोबरच कारखान्यातील संपूर्ण फर्निचर, एअर कंडिशनर, संगणक जळून खाक झाले, तर प्रेस पार्ट व मेटल फ्रेम या ठिकाणी आग पोहोचून येथील मशिनरी, वेल्ंिडग मशीन, ग्रार्इंडर, चाईल्ड पार्टचे नुकसान झाले़ कारखान्याच्या इमारतीलाही तडे गेले असून, खिडक्या, दरवाजे, शटर व लोखंडी वस्तुंचेही नुकसान झाले़
या आगीची माहिती अग्निशामक दलास मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून फोम व पाण्याच्या फोर्सने आग आटोक्यात आणली़ सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आठ ते दहा अग्निशामक बंबांच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले़ दरम्यान, या आगीच्या घटनेची सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Bags factory fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.