बागलाणच्या पश्चिम पट्ट्याचा संपर्क तुटला

By Admin | Updated: August 4, 2016 01:01 IST2016-08-04T01:00:53+5:302016-08-04T01:01:03+5:30

बागलाणच्या पश्चिम पट्ट्याचा संपर्क तुटला

Baglan's west-side collapsed contact | बागलाणच्या पश्चिम पट्ट्याचा संपर्क तुटला

बागलाणच्या पश्चिम पट्ट्याचा संपर्क तुटला


जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील वटार गावानजीक गेल्या महिन्यात रस्ता खचला असून, त्याची अद्याप कुठल्याही प्रकारे दखल घेतली नसून बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गुजरात माहामार्ग जोडणारा रस्ताच खचला आहे. सदर रस्ता विंचूर - प्रकाशा महामार्गाला जोडला जाणारा रस्ता आहे. बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील विंचुरे, जोरण, किकवारी बु।।, किकवारी खु।।, कपालेश्वर, तळवाडे, मोरकुरे, पठावे, मळगाव, पिसोरे, चाफापाडे आदि गावांचा भाजीपाला वाहतुकीसाठी मार्गच बंद पडला आहे. याची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन त्वरित रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Baglan's west-side collapsed contact