नाशिक : दि. पिंपळगाव मर्चण्ट बँकेच्या चेअरमनपदी विजयराज लखीचंद बाफणा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. बँकेच्या मावळत्या अध्यक्ष विद्या घोडके यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली.चेअरमनपदासाठी विजयराज लखीचंद बाफणा यांचा एकमेव अर्ज आल्याने सभेचे अध्यासी अधिकारी अभिजित देशपांडे यांनी बाफणा यांची चेअरमन म्हणून निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन प्रकाश गोसावी, ज्येष्ठ संचालक अशोक शाह, सोहन भंडारी, करसनदास ठक्कर, हिरालाल पगारीया, धनंजय गांगुर्डे, प्रकाश देशमुख, मनोहर पाटोळे, कालिदास खैरे, सुनंदा जैन, गफ्फार शेख, हसमुख शाह, वर्धमान बुरड, कांतिलाल पटेल, किशोर ठक्कर, डॉ. महेश बूब तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर शिंदे, महाव्यवस्थापक भोजराज जैन, तसेच पारस बाफणा, जयेश बाफणा, अंकुश बाफणा, शैलेश बाफणा, भिकू बाफणा, अमित बुरड, विरेंद्र बाफणा, दिलीप छाजेड, आशिष शाह, नंदू जंगम, गौतम बोरा आदी उपस्थित होते. (वा.प्र.)
पिंपळगाव मर्चण्ट्स बँकेच्या अध्यक्षपदी बाफणा बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 18:03 IST