बालनाट्य स्पर्धेची उद्यापासून धमाल !

By Admin | Updated: December 5, 2015 22:42 IST2015-12-05T22:41:32+5:302015-12-05T22:42:51+5:30

शाळांना आवाहन : सहा दिवसांत ३४ नाटकांची पर्वणी

Badlatta tournament to be played from tomorrow! | बालनाट्य स्पर्धेची उद्यापासून धमाल !

बालनाट्य स्पर्धेची उद्यापासून धमाल !

नाशिक : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने शहरात येत्या सोमवारपासून (दि. ७) तेराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची धूम रंगणार आहे. १२ डिसेंबरपर्यंत परशुराम साईखेडकर नाट्यगृहात चालणाऱ्या या स्पर्धेत सहा दिवसांत एकूण ३४ बालनाट्ये सादर होणार आहेत. सदर बालनाट्ये पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनाही आवाहन केले जात आहे.
बालनाट्य स्पर्धेची ही प्राथमिक फेरी आहे. स्पर्धेचे वेळापत्रक असे : दि. ७ : नवे गोकुळ (स. १०), रानमेवा पक्ष्यांना ठेवा (स. ११.१५), सुटका (दु. १२.३०), चिंगी (दु. १.४५), सीआयडी : एका खुनाचा शोध (दु. ३), जॉकी आणि तो (सा. ४.१५), दि. ८ : पंखातील आभाळ (स. १०), शहाणपण देगा देवा (स. ११.१५), सर तुम्ही गुरुजी व्हा (दु. १२.३०), फुलपाखराची गोष्ट (दु. १. ४५), अवताराची गोष्ट (दु. ३), दि. ९ : सूर्याची लेकरे (स. १०), होळी (स. ११.१५), उडाणटप्पू (दु. १२.३०), शाळा तुझी वाट पाहते (दु. १.४५), दुष्काळ (दु. ३), गणपती बाप्पा मोरया (सा. ४.१५), दि. १० : सपान (स. १०), अंधारफुले (स. ११.१५), बुळ बुळे (दु. १२.३०), भूत-भविष्य-भुतावळ (दु. १.४५), हे! तुम्ही करू शकता (दु. ३), थेंबांचे टपाल (सा. ४.१५), दि. ११ : आई (स. १०), पुन्हा नको रे बाबा (स. ११.१५), थेंबांचे टपाल (दु. १२.३०), बालपण (दु. १.४५), मु. पो. कळमसरा (दु. ३), इस्कोट (सा. ४.१५), दि. १२ : केल्याने होत आहे रे (स. १०), ए टू बी (स. ११.१५), एक होता वाघ (दु. १२.३०), मुलं देवाघरची फुलं (दु. १.४५), झाडवाली झुंबी (दु. ३).
स्पर्धेतील बालनाट्ये पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह सर्वांनाच मोफत प्रवेश आहे. शालेय विद्यार्थ्यांना खास आमंत्रित करण्यात आले असून, यासंदर्भात शहरातील शाळांना पत्रे पाठवून आवाहन करण्यात आले आहे, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक मनोज सानप, स्पर्धेचे समन्वयक राजेश जाधव यांनी कळवले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Badlatta tournament to be played from tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.