शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बडगाम हेलिकॉप्टर दुर्घटना : नाशिकच्या वीर जवान निनादचे पार्थीव ओझरला दाखल; वायुदलाकडून मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:16 IST

भारतीय सैन्याकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. शुक्रवारी (दि.२८) सकाळी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे निनाद हे मुळ नाशिकचे; पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन वर्षांची मुलगी असा परिवार शुक्रवारी (दि.२८) सकाळी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

नाशिक : जम्मु-काश्मिरच्या भारत-पाक सीमेवर मागील चार दिवसांपासून निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थीतीत लढाऊ हेलिकॉप्टरद्वारे सीमेवर टेहळणी करत असताना हेलिकॉप्टर कोसळून वैमानिक निनाद अनिल मांडवगणे (वय ३३) यांना वीरमरण आले. निनाद हे मुळ नाशिकचे. त्यांचे माता-पिता बॅँकेतून सेवानिवृत्त असून ते पुणे महामार्गावरील रवीशंकर मार्गालगत बॅँक आॅफ इंडिया कॉलनीत वास्तव्यास आहे. निनाद यांचे पार्थीव वायुसेनेच्या विमानातून रात्री दहा वाजेच्या सुमारास ओझर विमानतळावर आणण्यात आले. यावेळी भारतीय सैन्याकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. शुक्रवारी (दि.२८) सकाळी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

ओझर विमानतळावर शहीद निनाद यांचे पार्थिव दाखल होताच जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी., यांच्यासह वायूदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले व सैनिकांनी ‘सॅल्यूट’ केला. त्यांचे पार्थिव रात्रभर ओझर हवाई दलाच्या वातानुकूलित पेटी असलेल्या रुग्णवाहिकेत ठेवण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता ओझरहून शहीद निनाद यांचे पार्थिव त्यांच्या बँक आॅफ इंडिया कॉलनीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी आणण्यात येणार आहे. त्यानंतर दोन तासांनी शासकीय इतमामात अंत्ययात्रेला सुरूवात होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. डीजीपीनगर क्रमांक-१ला लागून असलेल्या या कॉलनीच्या परिसरात शोककळा पसरली असून गुरूवारी (दि.२८) दिवसभर तसेच रात्री उशीरापर्यंत त्यांच्या निवासस्थानी नागरिकांची गर्दी होती. निवासस्थानापासून ते अमरधाम हे साधारणत: पाच किलोमीटरचे अंतर असल्याने पोलिसांनी या मार्गावरील वाहतुकीचे विशेष नियोजनही केले आहे.जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले निनाद यांचे पार्थिव रात्री हवाई दलाच्या विशेष विमानाने ओझर विमानतळावर आणण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता नाशिक अमरधामजवळील गोदावरीच्या काठावर सिंहस्थ कुंभमेळ्यात बांधण्यात आलेल्या नव्या घाटाजवळ मैदानात त्यांच्या पार्थिवावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. निनाद यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन वर्षांची मुलगी असा परिवार आहे.शहीद निनाद यांच्यावर नाशिक येथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतल्यामुळे बुधवारी रात्री हवाई दलाने शहीद निनाद यांच्या लखनऊ येथील घरी चार दिवसांपुर्वीच नातीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पोहचलेल्या आजी, आजोबा व निनाद यांच्या पत्नीला आई, वडील, पत्नी व मुलगी अशा चौघांची नाशिक येथे पाठविण्यासाठी विमानाने सोय केली. त्यानुसार गुरुवारी सकाळी साडेसात वाजता मांडवगणे कुटुंबीयांनी लखनऊ येथून इंडिगो विमानाने मुंबईत दाखल झाले. दुपारी खासगी वाहनाने तीन वाजेच्या सुमारास ते निवासस्थानी पोहोचले. दरम्यान, शहीद निनाद यांचा लहान भाऊ निरव हा जर्मनीत एमबीएच्या प्रशिक्षणासाठी गेला असून, त्यालाही घटनेची माहिती देण्यात आल्याने तो नाशिककडे येण्यास निघाला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत तो नाशकात पोहोचेल असे, त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलNashikनाशिकMartyrशहीदJammu Kashmirजम्मू-काश्मीरHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटना