शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कचºयाची दुर्गंधी, धुराच्या लोटात वस्ती रामभरोसे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 10:04 PM

दिंडोरी : शहरानजीक कोराटे रस्त्यालगत घाणीच्या माथ्यावरील कचरा डेपोशेजारी छोट्या बदादे वस्तीचे आता सहाशे ते सातशे कष्टकऱ्यांचे श्रीरामनगर उभे राहिले आहे. मात्र येथे कोणत्याही नागरी सुविधा उपलब्ध नसल्याने दुर्गंधी व धुराच्या लोटात गुदमरत येथील नागरिक रामभरोसे जीवन जगत आहेत.

ठळक मुद्देदिंडोरी : विकासापासून वंचित; मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांचे आरोग्य वाºयावर

दिंडोरी : शहरानजीक कोराटे रस्त्यालगत घाणीच्या माथ्यावरील कचरा डेपोशेजारी छोट्या बदादे वस्तीचे आता सहाशे ते सातशे कष्टकऱ्यांचे श्रीरामनगर उभे राहिले आहे. मात्र येथे कोणत्याही नागरी सुविधा उपलब्ध नसल्याने दुर्गंधी व धुराच्या लोटात गुदमरत येथील नागरिक रामभरोसे जीवन जगत आहेत.दिंडोरी कोराटे रस्त्यावर शहरातील कचरा टाकला जात असल्याने येथील बरडा माथा घाणीचा माथा म्हणून परिचित झाला. येथे काही बदादे परिवार मोलमजुरीसाठी राहत होता. त्यांना तत्कालीन दिंडोरी ग्रामपालिकेकडून इंदिरा आवास योजनेचा लाभ मिळत बदादे वस्ती उभी राहिली. पाहता पाहता या कचरा डेपोशेजारील डोंगरमाथ्यावर १०० ते १३० कुटुंबांनी आपला संसार थाटला असून, येथे बंजारा, आदिवासी, मुस्लीम भटक्या जमातीचे कष्टकरी मोलमजुरी करणारे लोक राहतात. अतिक्रमित घरांची वस्ती मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली आहे. येथे डोंगर उताराला घर असून, घरापर्यंत जाण्यास नीट रस्ता नाही. पिण्याच्या पाण्यासाठी दोन हातपंप आहेत; पण त्यातील एक सुरूच झाला नाही. एक सुरू आहे तेथे २४ तास हंड्यांच्या रांगा लागलेल्या असतात. यंदा भूजल पातळी खोल गेल्याने कूपनलिकेला पाणी कमी पडले. एक हंडा भरायला एक तास लागत आहे. येथील रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, पाण्याचा टँकर विकत घ्यावा लागत आहे.नगरपंचायतीतर्फे टँकरद्वारे पाणी पुरवले जात असल्याचे सांगितले जात आहे; मात्र रोज टँकर येत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. सदर वस्तीत अंगणवाडी आहे तर नुकतेच नगरपंचायत, आमदार यांच्या सहकार्याने वीजपुरवठा सुरू झाला आहे. नगरपंचायतीने सदर वस्तीचा सर्व्हे करत सदर अतिक्रमित घरे कायम करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. स्वच्छ भारत अभियानअंतर्गत सर्व रहिवाशांना वैयक्तिक शौचालयाचा लाभ देण्यात आला आहे.(उद्या : पिंपळगाव बसवंत)सांडपाण्यामुळे रोगराईला निमंत्रण !सदर वस्तीलगत शहराचा कचरा डेपो आहे. येथे घनकचरा व्यवस्थापन सुरू केल्याने काहीसा कचºयाचा उपद्रव कमी झाला आहे. मात्र त्रास कायम आहे. ओल्या कचºयावर प्रक्रि या केली जात असून, कोरडा कचरा उघड्यावर टाकला जात आहे. त्यातील प्लॅस्टिक उडून थेट वस्तीत व आजूबाजूच्या शेतात जात आहे. परिसरात दुर्गंधीचा त्रास तर आहेच; पण कुणी कचरा पेटवून दिला की, धुराचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वस्तीत कोठेही गटार नसल्याने उघड्यावर सांडपाणी वाहत असून, विविध रोगराईला आमंत्रण मिळत आहे.श्रीरामनगर वस्तीचा सर्व्हे करून अतिक्रमित घरे कायम करण्याची प्रक्रि या सुरू आहे. वीज उपलब्ध करून देण्यात आली असून, वैयक्तिक शौचालय योजनेचा लाभ दिला आहे. पाणी समस्या दूर होण्यासाठी नळपाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे. मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत विकास आराखडा तयार केला असून, लवकरच त्याची अंमलबजावणी होईल. घनकचरा प्रक्रि या प्रकल्प हाती घेतला असून, तो यशस्वी झाल्यावर कचºयाचा त्रास कमी होईल. नागरिकांनी प्लॅस्टिकबंदीबाबत सहकार्य करायला हवे.- रचना जाधव, नगराध्यक्ष, दिंडोरी