कचºयाची दुर्गंधी, धुराच्या लोटात वस्ती रामभरोसे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:04 PM2019-06-05T22:04:09+5:302019-06-05T22:12:46+5:30

दिंडोरी : शहरानजीक कोराटे रस्त्यालगत घाणीच्या माथ्यावरील कचरा डेपोशेजारी छोट्या बदादे वस्तीचे आता सहाशे ते सातशे कष्टकऱ्यांचे श्रीरामनगर उभे राहिले आहे. मात्र येथे कोणत्याही नागरी सुविधा उपलब्ध नसल्याने दुर्गंधी व धुराच्या लोटात गुदमरत येथील नागरिक रामभरोसे जीवन जगत आहेत.

Bad smell of scent, Ram Bharose from the house of Smoke! | कचºयाची दुर्गंधी, धुराच्या लोटात वस्ती रामभरोसे !

कचºयाची दुर्गंधी, धुराच्या लोटात वस्ती रामभरोसे !

Next
ठळक मुद्देदिंडोरी : विकासापासून वंचित; मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांचे आरोग्य वाºयावर

दिंडोरी : शहरानजीक कोराटे रस्त्यालगत घाणीच्या माथ्यावरील कचरा डेपोशेजारी छोट्या बदादे वस्तीचे आता सहाशे ते सातशे कष्टकऱ्यांचे श्रीरामनगर उभे राहिले आहे. मात्र येथे कोणत्याही नागरी सुविधा उपलब्ध नसल्याने दुर्गंधी व धुराच्या लोटात गुदमरत येथील नागरिक रामभरोसे जीवन जगत आहेत.
दिंडोरी कोराटे रस्त्यावर शहरातील कचरा टाकला जात असल्याने येथील बरडा माथा घाणीचा माथा म्हणून परिचित झाला. येथे काही बदादे परिवार मोलमजुरीसाठी राहत होता. त्यांना तत्कालीन दिंडोरी ग्रामपालिकेकडून इंदिरा आवास योजनेचा लाभ मिळत बदादे वस्ती उभी राहिली. पाहता पाहता या कचरा डेपोशेजारील डोंगरमाथ्यावर १०० ते १३० कुटुंबांनी आपला संसार थाटला असून, येथे बंजारा, आदिवासी, मुस्लीम भटक्या जमातीचे कष्टकरी मोलमजुरी करणारे लोक राहतात. अतिक्रमित घरांची वस्ती मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली आहे. येथे डोंगर उताराला घर असून, घरापर्यंत जाण्यास नीट रस्ता नाही. पिण्याच्या पाण्यासाठी दोन हातपंप आहेत; पण त्यातील एक सुरूच झाला नाही. एक सुरू आहे तेथे २४ तास हंड्यांच्या रांगा लागलेल्या असतात. यंदा भूजल पातळी खोल गेल्याने कूपनलिकेला पाणी कमी पडले. एक हंडा भरायला एक तास लागत आहे. येथील रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, पाण्याचा टँकर विकत घ्यावा लागत आहे.
नगरपंचायतीतर्फे टँकरद्वारे पाणी पुरवले जात असल्याचे सांगितले जात आहे; मात्र रोज टँकर येत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. सदर वस्तीत अंगणवाडी आहे तर नुकतेच नगरपंचायत, आमदार यांच्या सहकार्याने वीजपुरवठा सुरू झाला आहे. नगरपंचायतीने सदर वस्तीचा सर्व्हे करत सदर अतिक्रमित घरे कायम करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. स्वच्छ भारत अभियानअंतर्गत सर्व रहिवाशांना वैयक्तिक शौचालयाचा लाभ देण्यात आला आहे.
(उद्या : पिंपळगाव बसवंत)सांडपाण्यामुळे रोगराईला निमंत्रण !सदर वस्तीलगत शहराचा कचरा डेपो आहे. येथे घनकचरा व्यवस्थापन सुरू केल्याने काहीसा कचºयाचा उपद्रव कमी झाला आहे. मात्र त्रास कायम आहे. ओल्या कचºयावर प्रक्रि या केली जात असून, कोरडा कचरा उघड्यावर टाकला जात आहे. त्यातील प्लॅस्टिक उडून थेट वस्तीत व आजूबाजूच्या शेतात जात आहे. परिसरात दुर्गंधीचा त्रास तर आहेच; पण कुणी कचरा पेटवून दिला की, धुराचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वस्तीत कोठेही गटार नसल्याने उघड्यावर सांडपाणी वाहत असून, विविध रोगराईला आमंत्रण मिळत आहे.श्रीरामनगर वस्तीचा सर्व्हे करून अतिक्रमित घरे कायम करण्याची प्रक्रि या सुरू आहे. वीज उपलब्ध करून देण्यात आली असून, वैयक्तिक शौचालय योजनेचा लाभ दिला आहे. पाणी समस्या दूर होण्यासाठी नळपाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे. मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत विकास आराखडा तयार केला असून, लवकरच त्याची अंमलबजावणी होईल. घनकचरा प्रक्रि या प्रकल्प हाती घेतला असून, तो यशस्वी झाल्यावर कचºयाचा त्रास कमी होईल. नागरिकांनी प्लॅस्टिकबंदीबाबत सहकार्य करायला हवे.
- रचना जाधव, नगराध्यक्ष, दिंडोरी

Web Title: Bad smell of scent, Ram Bharose from the house of Smoke!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.