शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

‘मॉलिक्युलर लॅब’चा प्रस्ताव मागे; पुण्यावर भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 10:05 PM

नाशिक : कोणत्याही विषाणूमुळे होणारे आजार शोधून काढण्यासाठी सध्या पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेवर अवलंबून रहावे लागत आहे. वस्तुत: नाशिक महापालिकेच्या वतीने मॉलिक्युलर लॅब सुरू करण्याचा निर्णय २०११-१२ मध्ये घेण्यात आला होता. ही लॅब वेळेत सुरू झाली असती तर कोरोनासह अन्य अनेक आजारांचे निदान नाशिक येथेच होऊ शकले असते. आता कोरोनामुळे शासनाकडून खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांना मान्यता दिली जात असताना महापालिकेतील वैद्यकीय सेवेची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे.

ठळक मुद्देपरावलंबित्व : प्राथमिकता बदलल्याने अहवालांसाठी प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोणत्याही विषाणूमुळे होणारे आजार शोधून काढण्यासाठी सध्या पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेवर अवलंबून रहावे लागत आहे. वस्तुत: नाशिक महापालिकेच्या वतीने मॉलिक्युलर लॅब सुरू करण्याचा निर्णय २०११-१२ मध्ये घेण्यात आला होता. ही लॅब वेळेत सुरू झाली असती तर कोरोनासह अन्य अनेक आजारांचे निदान नाशिक येथेच होऊ शकले असते. आता कोरोनामुळे शासनाकडून खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांना मान्यता दिली जात असताना महापालिकेतील वैद्यकीय सेवेची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे.नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविणे ही नाशिक महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालकीची नऊ मोठीरुग्णालये असून, अनेक दवाखाने आणि प्रसूतिगृहे आहेत. महापालिकेचे नाशिकरोड येथील बिटको रु ग्णालय हे सर्वांत मोठे रु ग्णालय आहे. या रुग्णालयात दररोज ५०० ते ७०० नागरिक बाह्यरुग्ण सेवेचा लाभ घेतात. त्याशिवाय जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन कथडा रुग्णालय, पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय, सिडकोतील श्री स्वामी समर्थ रुग्णालय सिन्नर फाटा येथील रुग्णालय यातही सामान्य नागरिक उपचारासाठी मोठ्या प्रमाणात जातात. महापालिकेच्या बिटको रुग्णालयाची क्षमता कमी पडत असल्याने या रु ग्णालयाचे नूतनीकरण करून नवीन सुसज्ज इमारतीची गरज निर्माण झाली. त्यामुळे २००८-०९ मध्ये प्रशासनाने नूतन इमारतीचा प्रस्ताव तयार केला होता.नयना घोलप या महापौर असताना हा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला. तो मंजूर झाल्यानंतर या रुग्णालयाच्या भूमिपूजनासाठी शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे आले होते. त्यांनी केवळ इमारतीचे विस्तारीकरण न करतात या रुग्णालयात मॉलिक्युलर लॅब सुरू करावी, अशी सूचना मांडली होती. त्या आधारे तत्कालीन सभागृहनेते सुधाकर बडगुजर यांनी पाठपुरावा करून प्रशासनाकडून हा प्रस्ताव तयार करून घेतला. सुमारे साडेसात कोटी रुपयांचा हा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला होता. महापालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. बी. पाटील यांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शासनाला पाठविला होता. त्यासाठी मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या तज्ज्ञांची त्यासाठी मदत घेतली होती. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असताना महापालिकेत सत्तांतर झाले...अन्यथा स्वबळावर सामना शक्यबिटको रु ग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम जवळपास पूर्ण झाले असले तरी ही इमारत अद्याप वापरायोग्य झालेली नाही. ६७ कोटी रु पये या इमारतीवर खर्च झाले आहेत. नऊ वर्षांत मनपा एक सुसज्ज रु ग्णालय बांधू शकले नाहीच, पण पुरेसे डॉक्टर मनपाच्या कोणत्याही रु ग्णालयात उपलब्ध नाहीत. योग्यवेळी या सर्व बाबींची पूर्तता केली असती तर या आपत्कालीन स्थितीचा सामना मनपा स्वबळावर करू शकली असती. मात्र, सद्यपरिस्थितीत तसे करण्यास मनपाचा आरोग्य विभाग सक्षम आहे का, याविषयी शंका आहे.२०१२ मध्ये महापालिकेत मनसेची सत्ता आली त्यावेळी विकासाचे प्राधान्यक्र म बदलले आणि मॉलिक्युलर लॅबचा प्रस्ताव मागे पडला. सद्यस्थितीत महापालिकेला डेंग्यू आणि स्वाइन फ्लू तसेच अन्य काही रोगांचे निदान करण्यासाठी रु ग्णांचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेत पाठवले लागतात.रोगराईचा काळ असेल तर नमुन्यांचा अहवाल येण्यास विलंब होतो. महापालिकेची मॉलिक्युलर लॅब त्यावेळी सुरू झाले असते तर सर्व प्रकारच्या विषाणूजन्य आजारांचे निदान नाशिकमध्ये होऊ शकले असते यासाठी पुण्याला प्रयोगशाळेवर अवलंबून राहण्याची वेळ आली नसती. सध्या कोरोनामुळे अशा प्रकारच्या आरोग्य सुविधांची उणीव प्रामुख्याने जाणवत आहे. त्यामुळे महापालिकेने आता तरी दखल घेऊन आरोग्य सुविधांकडे अधिक लक्ष पुरवण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगार