नायगाव आरोग्य केंद्रात जन्मले ४ किलो वजनाचे बाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 06:58 PM2019-04-24T18:58:00+5:302019-04-24T18:58:56+5:30

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ किलो १०० ग्रॅम वजनाचे बालक जन्माला आले.

 The baby weighs 4 kilograms born in the Naigaon health center | नायगाव आरोग्य केंद्रात जन्मले ४ किलो वजनाचे बाळ

नायगाव आरोग्य केंद्रात जन्मले ४ किलो वजनाचे बाळ

Next

नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गावातील ज्योती सागर माळी ही पहिल्या खेपेची गरोदर महिला प्रसूतीसाठी दाखल झाली. सदर महिला ही सामान्य कष्टकरी कुटुंबातील असतांना व तिच्याकडे सोनोग्राफी वा इतर कोणत्याही प्रकारचे तपासणी अहवाल उपलब्ध नसतांनाही सदर महिलेची प्रसूती ही आरोग्य सेविका लोंढे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य सेविका अनिता जाधव व करुणा जाधव यांच्या सहकार्याने सुखरूपपणे केली. सदर प्रसूती झाल्यानंतर बाळाचे वजन केले असता उपस्थित सर्व कर्मचारी व सदर महिलेचे नातेवाईक आश्चर्यचकित झाले, कारण त्या बाळाचे वजन हे चक्क ४ किलो १०० ग्रॅम इतके भरले. इतक्या वजनाचे बाळ असेल तर सामान्यत: महिलेची सिझेरियन प्रसूती होते परंतु नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे सदर महिलेची साधारण प्रसूती झाल्यामुळे सदर महिलेच्या कुटुंबीयांनी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका यांचे आभार मानले.

Web Title:  The baby weighs 4 kilograms born in the Naigaon health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य