आयुर्वेद ही सांस्कृतिक ठेव
By Admin | Updated: November 9, 2015 23:51 IST2015-11-09T23:51:07+5:302015-11-09T23:51:46+5:30
शेखर राजदेरकर : ‘आरोग्य भारती’च्या वतीने धन्वंतरी जयंती सोहळा

आयुर्वेद ही सांस्कृतिक ठेव
नाशिक : आयुर्वेद ही देशाची सांस्कृतिक ठेव असून, त्याचा आणखी सखोल अभ्यास होण्याची गरज आहे. आयुर्वेदात मानवी शरीराचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. शेखर राजदेरकर यांनी केले.
‘आरोग्य भारती’च्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित धन्वंतरी जयंती सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. शंकराचार्य संकुल येथे झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर, प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे, ‘आरोग्य भारती’चे राष्ट्रीय सचिव डॉ. रमेश गौतम, वैद्य विजय कुलकर्णी, डॉ. विकास गोगटे, संतोष पाठक उपस्थित होते. यावेळी वैद्य विजय कुलकर्णी यांच्या ‘आयुर्वेदीय संगीतोपचार’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
डॉ. विजय भोकरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. वैशाली भोकरे, प्रा. अनिता कुलकर्णी यांनी परिचय करून दिला. डॉ. राजदेरकर यांच्या हस्ते वैद्य मामासाहेब राजपाठक यांना ‘धन्वंतरी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. गौतम यांनी ‘आरोग्य भारती’च्या नाशिक शाखेची घोषणा केली.