मराठा समाजातील महिलांची दुचाकीवरून जागृती रॅली
By Admin | Updated: September 22, 2016 01:29 IST2016-09-22T01:29:22+5:302016-09-22T01:29:48+5:30
मराठा समाजातील महिलांची दुचाकीवरून जागृती रॅली

मराठा समाजातील महिलांची दुचाकीवरून जागृती रॅली
नाशिकरोड : मराठा क्रांती मूक मोर्चा जनजागृती करण्यासाठी परिसरातून दुपारी मराठा समाजाच्या महिलांनी दुचाकीवरून रॅली काढली.
मराठा क्रांती मूक मोर्चा तयारी व जनजागृतीसाठी देवळालीगाव येथून बुधवारी दुपारी ४ वाजता मराठा समाजाच्या महिलांनी दुचाकीवरून भगवे झेंडे हातात घेत रॅली काढली. सदर रॅली अनुराधा चौक, आर्टिलरी सेंटररोड, जयभवानी रोड, आनंदनगर, जगताप मळा, दत्तमंदिर रोड, मोटवानीरोड, जेलरोड शिवाजी पुतळा, बिटको पॉर्इंट, शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात आली होती. रॅलीच्या मार्गावरील शिव पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये नगरसेविका संगीता गायकवाड, योगिता देवकर, कामिनी तनपुरे, रेखा पाटील, सुरेखा पेखळे, वैशाली अपसुंदे, आशा पावसे, आशा टर्ले, आशा गोडसे पाटील, सोनाली पाटील, क्रांती गायकवाड, ज्योती उगले, कांचन चव्हाण, अॅड. वर्षा देशमुख, अॅड. कविता पगार आदि महिला सहभागी झाल्या होत्या.