'नो मास्क, नो वस्तू’ वर होणार जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:22 IST2020-10-11T23:46:42+5:302020-10-12T01:22:26+5:30

नाशिक: जिल्'ातील कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येत असली तरी अजूनही व्यापक सतर्कता राखणे आवश्यक आहे. सध्या शहरात मास्क वापरण्याबाबत काहीसा निष्काळजीपणा दाखविला जात असल्याने यापुढे मास्क वापराविषयी अधिकच लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील याबाबतचे संकेत दिले आहेत.

Awareness on 'No Mask, No Object' | 'नो मास्क, नो वस्तू’ वर होणार जनजागृती

'नो मास्क, नो वस्तू’ वर होणार जनजागृती

ठळक मुद्देसतर्कता: ग्राहकांबरोबरच दुकानदारांवरी करणार लक्ष केंद्रीत

नाशिक: जिल्'ातील कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येत असली तरी अजूनही व्यापक सतर्कता राखणे आवश्यक आहे. सध्या शहरात मास्क वापरण्याबाबत काहीसा निष्काळजीपणा दाखविला जात असल्याने यापुढे मास्क वापराविषयी अधिकच लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील याबाबतचे संकेत दिले आहेत.

कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या नाशिक जिल्'ातील परीस्तिथीतीत सुधारणा होत आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असतांना दुसरीकडे अनलॉकमुळे अनेक व्यवहार आणि आस्थापना सुरळीत सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे सहाजिकच रस्त्यावरील तसेच दुकानांमधील गर्दीत वाढही झालेली आहे. अर्थचक्र सुरळीत होण्यासाठी उद्योग व्यवसायांना परवानगी दिलेली असली तरी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे त्यांना बंधन आहे. मात्र सध्या मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे नियम पाळले जात नसल्याचे चित्र दिसते.

जिल्'ातील कारोनाची परीस्थिती सुधारत असतांना नागरीकांच्या निष्काळजीपणामुळे नियंत्रणाला खीळ बसू नये यासाठी आता जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि महापालिकेकडून मास्क वापराबाबत जनजागृतीची अधिक व्यापक मोहिम राबविली जाणार आहे. यापूर्वी रेशनदुकानदार संघटनांनी सकारात्मक पाऊल उचलून ‘नो मास्क-नो रेशन’ अशी भूमिका घेतलेली तर बाजार समित्यांकडूनही ‘नो मास्क - नो एन्ट्री’ अशी भूमिका घेतली जाणार आहे. काही राजकीय पक्ष आणि नगरसेवकांनी देखील मास्क वापराविषयीची जनाजगृती सुरू केलेली आाहे. काही प्रभागांमध्ये नागरीकांना मास्कचे देखील वाटप करण्यात आलेले आहे.

पोलिसांकडून मास्क न वापरणारुंवर कारवाई करीत आहेतच. आता ही मोहीम अधिक व्यापक केली जाणार आहे. तर महापालिका दुकानदारांना याबाबतची समज देणार असून दुकानदारांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. ग्राहकांना मास्क लावलेला नसेल तर त्यांना वस्तू न देण्याची भुमिका दुकानदारांनी घ्यावी यासाठी जनजागृती केली जाणार आहे. मास्क वापराबाबत दुकानदारांकडून दुर्लक्ष झाल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.

कोरानाला नियंत्रणात ठेवण्यासाठी मास्क वापरणे हा एक महत्वाचा पर्याय आहे. मास्क वापरणे आपल्या आणि इतरांच्या देखील हिताचे आहे. मास्क न वापरणाऱ्यांबाबत महापालिका आणि पोलीस प्रशासन संबंधितांवर कारवाईची भूमिका बजावत आहेत.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.

 

Web Title: Awareness on 'No Mask, No Object'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.