हामार्ग पोलिसां कडून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 03:40 PM2020-01-14T15:40:53+5:302020-01-14T15:41:19+5:30

पिंपळगाव बसवंत : प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक व महामार्ग पोलीस पिंपळगाव बसवंत परिसर यांच्या संयुक्त विद्यमानाने ३१ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त ठीक ठिकाणी वाहनचालकांना व नागरिकांना वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली .

 Awareness from Highway Police | हामार्ग पोलिसां कडून जनजागृती

  पिंपळगाव बसवंत येथे वाहतूक नियमावर मार्गदर्शन करतांना पोलीस सहायक वर्षा कदम समेवत विद्यार्थी व पोलीस कर्मचारी. 

googlenewsNext
ठळक मुद्दे सुरक्षा सप्ताह: हेल्मेट घातलेल्या वाहनधारकांचा सत्कार


सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनधारकांना वाहतूक नियमाचे पत्रके देण्यात आले त्या अनुषंगाने अंमलबजावणी करावी याबाबत प्रबोधन देखील करण्यात आले.सीटबेल्ट लावलेल्या वाहनचालकांना व हेल्मेट घातलेल्या वाहनधारकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ट्रॅक्टर,ट्रक ,बस यांना लाल रिप्लेक्टर बसवण्यात आले.
एच.एस.पी पिंपळगाव हद्दीत व एच एल ओझर येथील गोखले एज्युकेशन,ज्युनियर कॉलेज संस्थेच्या वतीने आयोजित महिला सक्षमिकरण उपक्र म अंतर्गत पतंग महोत्सवास भेट देऊन तेथील सहभागी व वेगवेगळ्या कॉलेजच्या विद्यार्थिनींना वाहतूक नियमांची चर्चा करून महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच महिला वरील वाढते लैंगिक अत्याचार याविषयी प्रबोधन करून अन्यायाविरोधात प्रतिकार करण्याबाबत जागृती करण्यात आली. तसेच पतंग उडवताना नायलॉन मांज्या चा वापर न करणेबाबत सूचना देऊन आवश्यक ती दक्षता घेऊन दुचाकी स्वाराना व पक्षांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्र मास सहा. पोलीस निरीक्षक महामार्ग पो.केंद्र पिंपळगाव वर्षा कदम,
शिक्षण अधीक्षक खंडेलवाल,कुलकर्णी, कॉलेजचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थिनी व पोलीस हवालदार राठोड ,योगेश वाघ,संदीप भालेराव आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. 

कादवा साखर कारखान्यावर जनजागृती...
कादवा साखर कारखान्यावर ऊस वाहतूक करणार्या 50वाहनांना रिफ्लेकटर लावून ऊस वाहतूक करणार्या वाहन धारकांना वाहतूक नियमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
 

Web Title:  Awareness from Highway Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.