शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

नागरिकांच्या जागरुकतेमुळे वाचले पक्ष्याचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:54 IST

देवळा : तालुक्यातील मकरंदवाडी परिसरात शेतात सापडलेल्या आफ्रिकन ब्ल्यू क्रेन (क्रौंच ) पक्ष्याला देवळा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन योग्य ते उपचार करण्यात आले. त्यास वनविभागाच्या कार्यालयात सुरक्षितपणे ठेवण्यात आले असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

मकरंदवाडी येथील शेतकरी गुलाब भदाणे मंगळवारी शेतात काम करीत असताना आकाशातून एक पक्षी अचानक शेतात कोसळल्याचे त्यांनी पाहिले. परिसरात आढळणाऱ्या पक्ष्यांपेक्षा हा पक्षी त्यांना आकाराने मोठा व अनोळखी वाटला. भदाणे यांनी या पक्ष्याला उचलून आपल्या शेतातील चाळीत सुरक्षितपणे ठेवले व देवळा वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे वनपाल डी.पी. गवळी, वनरक्षक जी.जी. पवार आदी कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पक्षी त्यांनी ताब्यात घेऊन त्यास त्वरित उपचारासाठी पशुधन विकास अधिकारी झेंबरे यांच्याकडे आणले. योग्य ते उपचार केल्यानंतर ह्या पक्ष्याचे प्राण वाचवण्यात यश आले.आफ्रिकन ब्ल्यूहा पक्षी आफ्रिकन ब्ल्यू क्रेन जातीचा असून हा पक्षी अंदाजे आठ हजार सातशे कि.मी.चा प्रवास करून आलेला आहे. तो नांदूरमधमेश्वर येथील पक्षी अभयारण्यात जात असताना अशक्तपणामुळे तो खाली पडला असावा, असा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. बी. पाटील यांनी व्यक्त केला. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे पक्ष्याची प्रकृती सुधारत असून वनविभागाने त्यास नैसर्गिक वातावरणात ठेवले आहे. उडण्यायोग्य झाल्यानंतर त्यास पुन्हा सोडण्यात येणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक