प्रभाग २७ मध्ये जनजागृती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:11 IST2021-06-20T04:11:30+5:302021-06-20T04:11:30+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक कोरोना महामारीमुळे त्रस्त झाले आहेत. कोरोना आजारामुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले असून, यातून ...

Awareness campaign in ward 27 | प्रभाग २७ मध्ये जनजागृती मोहीम

प्रभाग २७ मध्ये जनजागृती मोहीम

गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक कोरोना महामारीमुळे त्रस्त झाले आहेत. कोरोना आजारामुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले असून, यातून सावरत नाही, तोच चिकनगुनिया व डेंग्यू या आजाराने डोके वर काढले आहे अनेकांना ताप येणे, तसेच हात पाय दुखणे, अशक्तपणा येणे, सांधेदुखी असे त्रास होत आहे, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पाहणी दौऱ्यात नगरसेवक राकेश दोंदे यांच्यासह मनपा घनकचरा विभागाच्या व्यवस्थापक डॉ.कल्पना कुटे, जीवन तज्ज्ञ डॉ.राजेंद्र त्रंबके, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, मुकादम रावसाहेब रूपवते, राजू गायकर, रवि सोनार, तसेच प्रभागातील राहुल राऊत, राहुल दोंदे, अनिल वाघमारे, अरुण जाधव, नाना नेटावरे, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

फोटो ओळी

प्रभाग क्रमांक २७ मध्ये साथीच्या आजाराबाबत जनजागृती मोहीम प्रसंगी नगरसेवक राकेश दोंदे समवेत डॉ.कल्पना कुटे, राजेंद्र त्रंबके, संजय गांगुर्डे, रावसाहेब रूपवते, रवि सोनार, राहुल राऊत आदी. (फोटो १९ सिडको)

===Photopath===

190621\19nsk_25_19062021_13.jpg

===Caption===

जनजागृती मोहीम

Web Title: Awareness campaign in ward 27