अपघात प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृतीपर ध्वनिफीत अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:12 IST2021-07-16T04:12:05+5:302021-07-16T04:12:05+5:30
ध्वनिचित्रफितीचे दिग्दर्शन सोनू अहिरे यांनी केले असून, गायक आदर्श शिंदे व स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातून चित्रफीत साकारण्यात आली. संगीत ...

अपघात प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृतीपर ध्वनिफीत अनावरण
ध्वनिचित्रफितीचे दिग्दर्शन सोनू अहिरे यांनी केले असून, गायक आदर्श शिंदे व स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातून चित्रफीत साकारण्यात आली. संगीत ज्ञानेश्वर कासार व गोकुळ पाटील यांनी दिले आहे. ध्वनिचित्रफितीत वाहनधारकांनी वाहन चालविताना कशा पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे व नियमांचे उल्लंघन केल्याने कशा पद्धतीने अपघात होऊ शकतो, हे दाखविण्यात आले आहे.
चित्रफीत नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न प्रादेशिक परिवहन विभाग करत आहे. चित्रफितीत ज्ञानेश्वर काकड, सुशील शिंदे, बबन ढगे, सुनील पवार, सनी दानी, संदीप धात्रक, तुषार गांगुर्डे, सुमन अहिरे, रंजना अहिरे, सोमेश्वर मुळाने, डॉ. मनीषा रोंदळ, तसेच बालकलाकार शर्वरी अहिरे, अनुष्का यादव, मयुरी अहिरे, विहान गांगुर्डे, राहुल अहिरे आदी कलाकारांनी काम केले आहे.
नियोजन हॉल विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यक्रम झाला. चित्रफितींच्या उद्घाटनप्रसंगी परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, विशेष पोलीस महानिरीक्षक अक्ष्वती दोर्जे, मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर आदी उपस्थित होते.
(फोटो)