नांदूरशिंगोटेत कोरोना विषाणूबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:14 IST2021-03-21T04:14:09+5:302021-03-21T04:14:09+5:30

येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून सकाळी अकरा वाजता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विकास काळे, सरपंच गोपाल शेळके, उपसरपंच कविता सानप, आरोग्य विभागाच्या ...

Awareness about corona virus in Nandurshingota | नांदूरशिंगोटेत कोरोना विषाणूबाबत जनजागृती

नांदूरशिंगोटेत कोरोना विषाणूबाबत जनजागृती

येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून सकाळी अकरा वाजता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विकास काळे, सरपंच गोपाल शेळके, उपसरपंच कविता सानप, आरोग्य विभागाच्या प्रणाली दिघे यांच्या उपस्थितीत रॅलीला सुरुवात करण्यात आली. जनजागृती रथ गावातून फिरून कोरोना विषाणूबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी सोशल डिस्टन्सचा वापर करावा, प्रत्येकाने तोंडाला मास्क लावावे, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा याबाबत ध्वनीपेक्षकावरून सूचना करण्यात आल्या. तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शुक्रवारचा आठवडा बाजार बंद असल्याने फक्त भाजीपाला बाजार सुरू ठेवण्यात आला होता. तसेच गावातील व्यावसायिकांना सोशल डिस्टन्सचा वापर करीत मास्क वापरणे बंधनकारक करण्यासाठी सूचना देण्यात आल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उत्तम बर्क, भारत दराडे, विद्या भाबड, रामदास सानप, नानासाहेब शेळके, अनिल पठारे, ग्रामविकास अधिकारी एस. डी. आहिरे, आडके आदींसह, अंगणवाडी व आशा सेविका, कार्यकर्त्या, आरोग्य कर्मचारी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

--------------------

नांदूरशिंगोटे येथे जनजागृती मोहीमप्रसंगी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विकास काळे, गोपाल शेळके, कविता सानप, उत्तम बर्क, भारत दराडे, विद्या भाबड, रामदास सानप, नानासाहेब शेळके, अनिल पठारे, एस. डी. आहिरे आदी. (२० नांदूरशिंगोटे)

===Photopath===

200321\20nsk_16_20032021_13.jpg

===Caption===

२० नांदूरशिंगोटे

Web Title: Awareness about corona virus in Nandurshingota