स्वखर्चाने वाहन फलकाद्वारे कोरोनाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 18:05 IST2020-03-29T18:03:35+5:302020-03-29T18:05:16+5:30
निफाड : कोरोना रोगाच्या बाबतीत जनजागृती व्हावी यासाठी वंदे मातरम ग्रुपच्या वतीने एक फिरते वाहन भाड्याने लावले असून या फिरत्या वाहनावर डिजिटल फलक लावून आणि आॅडिओ क्लिपद्वारे निफाड शहरात कोरोना बाबत बचाव करण्यासाठी गेल्या १२ दिवसापासून जनजागृती करण्यात येत आहे.

स्वखर्चाने वाहन फलकाद्वारे कोरोनाबाबत जनजागृती
निफाड : कोरोना रोगाच्या बाबतीत जनजागृती व्हावी यासाठी वंदे मातरम ग्रुपच्या वतीने एक फिरते वाहन भाड्याने लावले असून या फिरत्या वाहनावर डिजिटल फलक लावून आणि आॅडिओ क्लिपद्वारे निफाड शहरात कोरोना बाबत बचाव करण्यासाठी गेल्या १२ दिवसापासून जनजागृती करण्यात येत आहे.
जेव्हा कोरोनाची चर्चा सर्वत्र व्हायला लागली तेव्हा निफाडकर नागरिकांत कोरोना रोगाच्या बाबतीत जनजागृती व्हावी यासाठी एका फिरत्या वाहनाद्वारे निफाड मध्ये जनजागृती केल्यास कोरोना विषाणू पासून दूर राहण्यासाठी निफाडकर नक्कीच काळजी घेतली व उपाययोना करतील या सामाजिक भावनेतून वंदे मातरम् ग्रुुपचे संस्थापक विक्र म रंधवे यांनी स्वखर्चाने ही संकल्पना त्यांनी ही संकल्पना अमलात आणली. यासाठी त्यांनी चक्क एक वाहन भाड्याने लावले आहे. या वाहनावर कोरोना रोगाबाबत नागरिकानी काय काळजी घ्यावी याचा एक डिजिटल बॅनर लावला आहे. याच वाहनावर लाऊडस्पीकर बसवून आॅडिओ क्लिपद्वारे कोरोना रोगाबाबत नागरिकांनी कोण कोणती काळजी घ्यावी, याबाबतच्या उपाययोजना नागरिकांना ऐकवल्या जातात आहेत. नागरिकांनी मास्क वापरावे, बाहेरून घरी आल्यावर सॅनिटाईझरने किंवा साबणाने हात धुवावे या इतर उपाययोजना या आॅडिओ क्लिपद्वारे ऐकवल्या जात आहेत. गेल्या ८ दिवसापासून या फिरत्या वाहनाद्वारे निफाड शहरात हे सामाजिक कार्य चालू आहे.
शिवाय रंधवे यांनी निफाड शहरात जागोजागी कोरोना विषाणूला दूर ठेवण्यासाठी असलेल्या उपाययोजनांचे डिजिटल बॅनर लावले आहेत.