केटीएचएमला ई-कंटेंट निर्मितीसाठी पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:14 IST2021-02-12T04:14:20+5:302021-02-12T04:14:20+5:30
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येत असून, नाशिकमधील केटीएचएम महाविद्यालयास ‘उत्कृष्ट ई-कंटेंटनिर्मिती’साठी ...

केटीएचएमला ई-कंटेंट निर्मितीसाठी पुरस्कार
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येत असून, नाशिकमधील केटीएचएम महाविद्यालयास ‘उत्कृष्ट ई-कंटेंटनिर्मिती’साठी डॉ. एच.व्ही. देसाई पुरस्काराने गौरविण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.बी. गायकवाड यांना २५ हजार रुपये रोख व चषक या स्वरूपात पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित या पुरस्कार सोहळ्यात केटीएचएम महाविद्यालयाचा विद्यार्थी तथा बुद्धिबळ खेळाडू विदित गुजराथी यांना क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, यूजीसी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या हस्ते केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.बी. गायकवाड व विदित गुजराथी यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी महाविद्यालयाचे डॉ. रामनाथ आंधळे यांना बेस्ट ई-कंटेंट को-ऑर्डिनेटर, तर प्रा. कांचन बागूल यांचा बेस्ट ई-टीचर इन ह्युमिनिटीज पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
===Photopath===
110221\11nsk_9_11022021_13.jpg
===Caption===
प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांना स्रस्कार प्रदान करताना कुरुगुरू डॉ. नितीन करमाळकर. समवेत डॉ.भूषण पटवर्धन ,डॉ. रामनाथ आंधळे आदी