किशोर देशमुख यांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:11 IST2021-06-25T04:11:56+5:302021-06-25T04:11:56+5:30

-------------------------- प्रज्ञा शोध परीक्षेत यश सिन्नर : राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत नाशिप्र मंडळाच्या चांडक कन्या विद्यालयातील विद्यार्थिनी प्राजक्ता वाघ ...

Award to Kishore Deshmukh | किशोर देशमुख यांना पुरस्कार

किशोर देशमुख यांना पुरस्कार

--------------------------

प्रज्ञा शोध परीक्षेत यश

सिन्नर : राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत नाशिप्र मंडळाच्या चांडक कन्या विद्यालयातील विद्यार्थिनी प्राजक्ता वाघ हिने यश संपादन केले. प्राजक्ता वाघ ही १४२ गुण मिळवून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना मुलींना शाळेत येणे शक्य नव्हते म्हणूनच संस्थेने विषयात पारंगत शिक्षकांच्या ऑनलाइन तासिका विद्यार्थ्यांसाठी सुरू केल्या होत्या. मुख्याध्यापिका रेखा हिरे, पर्यवेक्षक चंद्रभान कोटकर यांच्यासह विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

-----------------------

सायकलिस्ट असोसिएशनतर्फे योग वर्ग

सिन्नर : सातव्या जागतिक योग दिनाचे औचित्य साधून सायकलिस्ट असोसिएशनतर्फे लक्ष्मी नारायण लॉन्स येथे योग वर्ग घेण्यात आला. योग शिक्षक समाधान गायकवाड यांनी योगाचे महत्त्व सांगून उपस्थित नागरिकांकडून योगासन, प्राणायाम करून घेतले. यावेळी सिन्नर सायकलिस्ट असोसिएशनचे सभासद निलेश गावंड, उदय गायकवाड, डॉ. प्रताप पवार, किसन लोणारे, योगेश रुद्राक्ष, गणेश तांबोळी, निशा गायकवाड आदींसह नागरिक उपस्थित होते. असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश चव्हाण यांनी आभार मानले.

Web Title: Award to Kishore Deshmukh