शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृत भाषा सभेकडून पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:04 IST

येथील सुमारे ४८ वर्षे जुनी संस्कृत भाषा सभा या संस्थेच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

नाशिक : येथील सुमारे ४८ वर्षे जुनी संस्कृत भाषा सभा या संस्थेच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. मंगळवारी (दि.२३) समारंभपूर्वक पुरस्कार वितरण करून मान्यवर पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात आला.परशुराम साईखेडकर सभागृहात सभेच्या वतीने ४८व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. देवदत्त देशमुख, सरिता देशमुख, तेजश्री वेदविख्यात, शोभा सोनवणे यांच्यासह पुरस्कारार्थी उपस्थित होते. याप्रसंगी सचिन जोशी, जयंत गायधनी, रूपाली झोडगेकर, श्रीमती वर्णा यांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात आले. सभेचे अध्यक्ष रमेश देशमुख यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.यावेळी जोशी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, मेंदूच्या विकासासाठी बालकांना बालवयातच संस्कृत भाषेचे श्लोक, सुभाषितांचे संस्काराची गरज आहे.  संस्कृत भाषा लहान मुलांच्या बुद्धीमत्तेचा विकास घडवून आणण्यास मदत करते. त्यामुळे लहान वयातच मुलांवर संस्कृतचे संस्कार पालकांकडून होणे आवश्यक आहे. प्रास्ताविक देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन नूपुर सावजी, डॉ. अभिजित सराफ यांनी केले.रंजक सादरीकरणाने जिंकली मनेनाट्यहोत्र या हौशी संस्कृत नाट्यसंस्थेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे यांनी लिहिलेल्या कथेचे नाट्यरूपांतर ‘अहमेव ते वहिदा’ या एकांकिकेचे रंजक सादरीकरणाने उपस्थित रसिकांची मने जिंकली. महिमा ठोंबरे दिग्दर्शित या एकांकिकेचा प्रयोग चांगलाच रंगला. रमाकांत नावाच्या सरकारी नोकराला एकदा अचानक अभिनेत्री वहिदा रहेमानचे पत्र येते अन् मग संपूर्ण चाळीत एकच गोंधळ उडतो. त्यामुळे चार वर्षांपूर्वीच विवाह करून आलेल्या रमाकांतची पत्नी रमाची मोठी घालमेल होऊन गोंधळाची अवस्था होते. चाळीत राहणाऱ्यांकडूनही वेगवेगळे चित्र या परिस्थितीवरून उभे केले जाते, याभोवती कथानक फिरते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक