कामटवाडे येथे पुरस्कार वितरण

By Admin | Updated: November 1, 2015 21:56 IST2015-11-01T21:56:18+5:302015-11-01T21:56:42+5:30

कामटवाडे येथे पुरस्कार वितरण

Award distribution at Kamtawade | कामटवाडे येथे पुरस्कार वितरण

कामटवाडे येथे पुरस्कार वितरण

सिडको : कामटवाडे येथील शिवशाही सामाजिक विकास संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला होता. यानिमित्त उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्यांना बंपर बक्षीस वाटप करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही शिवशाही सामाजिक विकास संस्थेतर्फे नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया रासचे आयोजन मंडळाचे संस्थापक व मनसेचे गटनेते अनिल मटाले यांनी केले होते. तसेच यानिमित्त स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. दररोज दांडिया खेळणाऱ्या १०० ते १५० लहान मुलांना बक्षीस वाटप करण्यात आले. गेल्या नऊ दिवस उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्यांना नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी बंपर बक्षीस वाटप करण्यात आले. यात पैठणी साडी, सायकल, होम थिएटर आदिंसह अनेक बक्षिसे वाटप करण्यात आली. बक्षिसांचे वाटप मनसे प्रदेशाध्यक्ष राहुल ढिकले, उपमहापौर गुरुमित बग्गा, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, माजी नगरसेवक बाळासाहेब मटाले यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत अनिल मटाले यांनी केले. यावेळी सुनील मटाले, भाऊसाहेब खेडकर, विनोद वैष्णव, सुरज मटाले, नरसिंग तोंडारे, प्रमोद मटाले, नंदू गायकर आदि उपस्थित होते. (वार्ताहर)कामटवाडे गावात नवरात्र उत्सवानिमित्त बंपर बक्षिसांचे वाटपप्रसंगी राहुल ढिकले, गुरुमित बग्गा, बाळासाहेब मटाले, अनिल मटाले, अतुल झेंडे, दिनेश बर्डेकर आदि.

Web Title: Award distribution at Kamtawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.