पुरस्कार वितरण सोहळा अखेर रद्द
By Admin | Updated: January 6, 2017 01:05 IST2017-01-06T01:05:41+5:302017-01-06T01:05:55+5:30
पुरस्कार वितरण सोहळा अखेर रद्द

पुरस्कार वितरण सोहळा अखेर रद्द
नाशिक -जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या आदर्श पुरस्कार सोहळा शुक्रवारी (दि. ६) बोलविण्यात आला होता. मात्र गुरुवारपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आल्याने हा सोहळा रद्द करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना आदर्श पुरस्कार दिला जातो. त्यात विविध प्रकारच्या पुरस्कारांचा समावेश असतो.
महिला शिक्षिकांसाठी आदर्श सावित्रीबाई
फुले महिला आदर्श पुरस्काराची सुरुवात नाशिक जिल्हा परिषदेने केली आहे. तसेच आदर्श ग्रामसेवक, आदर्श शिक्षक, आनंदीबाई जोशी पुरस्कार यांसह विविध पुरस्कारांचे वितरण एकाच वेळी एकाच ठिकाणी करण्याचा प्रयत्न मागील दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेने सुरू केला आहे. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा ६ जानेवारीला आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनातर्फे एका खासगी लॉन्सचे बुकिंगही केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात मोठ्या प्रमाणावर होती. हा सोहळा आता आचारसंहिता उठल्यानंतरच करण्यात येईल, अशी चिन्हे आहेत.
(प्रतिनिधी)