कृषी दिनानिमित्त पुरस्कार वितरण
By Admin | Updated: July 1, 2017 23:52 IST2017-07-01T23:51:38+5:302017-07-01T23:52:01+5:30
नयना गावित : शेतीपूरक व्यवसाय काळाची गरज

कृषी दिनानिमित्त पुरस्कार वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : बदलत्या काळानुरूप शेतकरी बांधवांनी पारंपरिक शेती न करता शेतीपूरक व्यवसाय करावेत, ती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती नयना गावित यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात कृषी दिनाच्या औचित्यावर जिल्हास्तरीय पीक स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे होत्या. तसेच व्यासपीठावर उपाध्यक्ष नयना गावित, सभापती मनीषा पवार, सुनीता चारोस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम जगताप, जिल्हा परिषद सदस्य महेंद्रकुमार काले, हिरामण खोसकर, यशवंत ढिकले, यशवंत शिरसाट, सुरेश कमानकर, सिमंतीनी कोकाटे, अनिता शिंदे, ज्योती वाघले, आत्मा प्रकल्प संचालक प्रशांत कांबळे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, कैलास खैरनार आदी उपस्थित होते. यावेळी महेंद्रकुमार काले, यशवंत शिरसाट, प्रगतिशील शेतकरी सदूभाऊ शेळके, शिवनाथ बोरसे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी विकास योजना पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कृषी अधिकारी अभिजित जमदाडे यांनी तर आभार जिल्हा कृषी विकास अधिकारी हेमंत काळे यांनी मानले.शेतकऱ्यांना पुरस्कार वितरण
च्कृषी विभागामार्फत घेण्यात आलेल्या सन २०१६-१७ च्या भात पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. त्यात प्रथम क्रमांक पंढरीनाथ विठ्ठल डगळे (दोनवाडे) व सुंदराबाई हरी घुटे (फणसपाडा) यांना विभागून १० हजार, द्वितीय क्रमांक रवींद्र नारायण मौळे (हनुमाननगर) सात हजार व तृतीय क्रमांक रवींद्र मोहन वाघमारे (गावधपाडा) पाच हजार रुपये यांना देण्यात आला.