बीवायके महाविद्यालयास पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:18 IST2021-08-21T04:18:10+5:302021-08-21T04:18:10+5:30

नाशिक : येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बीवायके कॉमर्स कॉलेजला इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, नवी दिल्ली ...

Award to BYK College | बीवायके महाविद्यालयास पुरस्कार

बीवायके महाविद्यालयास पुरस्कार

नाशिक : येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बीवायके कॉमर्स कॉलेजला इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, नवी दिल्ली या संस्थेतर्फे नुकतेच ‘क्वालिटी एक्सलन्स-२०२१’ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.

बीवायके महाविद्यालयाने राबविलेला पुनर्रचित अभ्यासक्रम, सातत्याने तीन वेळा मिळवलेले नॅकचे ‘अ’ श्रेणी मूल्यांकन विशेष ठरले. तसेच आयएसओ ऑडिट ९००१-२०१५ हे मानांकन तसेच महाविद्यालयाने उद्योजकता विकासासाठी केलेले प्रयत्न व विद्यार्थी पातळीवर घेतलेले विविध सेमिनार यासाठी महाविद्यालयास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच व्यक्तिगत गटातून महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. लीना भट यांना ‘क्वालिटी ॲवाॅर्ड’ प्राप्त झाला आहे. महाविद्यालयास हे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ सर डॉ. मो. स. गोसावी यांनी सर्व संबंधितांचा सन्मान केला.

Web Title: Award to BYK College