हिरोशीमा घटनेच्या जागविल्या स्मृती
By Admin | Updated: August 7, 2015 22:54 IST2015-08-07T22:53:34+5:302015-08-07T22:54:00+5:30
हिरोशीमा घटनेच्या जागविल्या स्मृती

हिरोशीमा घटनेच्या जागविल्या स्मृती
नाशिक : रवींद्रनाथ विद्यालयात हिरोशीमा दिनानिमित्त त्या दुर्घटनेच्या स्मृती जागविण्यात आल्या आणि जागतिक शांततेचे समर्थन करण्यात आले.
दुसरे जागतिक महायुद्ध सुरू असताना ६ आॅगस्ट व ९ आॅगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशीमा व नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकून मोठा नरसंहार केला होता. त्या घटनेचे स्मरण करणारा कार्यक्रम रवींद्रनाथ विद्यालयात संपन्न झाला. यावेळी त्या दुर्घटनेतील बळींना आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्याध्यापक रामदास गायधनी आणि पर्यवेक्षक पुष्पा काळे यांनी हिरोशीमा दिनाची माहिती दिली. दत्तात्रेय दानडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)