पालिकेची हेल्पलाइनला नव्या आयुक्तांची प्रतीक्षा

By Admin | Updated: May 22, 2014 00:17 IST2014-05-21T22:55:09+5:302014-05-22T00:17:53+5:30

नाशिक- महापालिकेच्या हेल्पलाइनेचे काम अंतिम टप्प्यात असून, आता नवीन आयुक्तांनी कार्यभार स्वीकारल्यानंतरच ती कार्यान्वित होऊ शकणार आहे.

Awaiting the new Commissioner's helpline | पालिकेची हेल्पलाइनला नव्या आयुक्तांची प्रतीक्षा

पालिकेची हेल्पलाइनला नव्या आयुक्तांची प्रतीक्षा

नाशिक- महापालिकेच्या हेल्पलाइनेचे काम अंतिम टप्प्यात असून, आता नवीन आयुक्तांनी कार्यभार स्वीकारल्यानंतरच ती कार्यान्वित होऊ शकणार आहे.
महापालिकेच्या विविध विभागांचा नागरी कामांशी संबंध असतो. परंतु त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, काम पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागतो, यांसारखे अनेक प्रश्न असून त्यासाठी महापालिकेत चकरा घालाव्या लागतात. तसे होऊ नये यासाठी महापालिकेने हेल्पलाइन तयार केली आहे. विशिष्ट क्रमांकावर दूरध्वनी केल्यानंतर कोणत्याही विभागाची माहिती त्या नागरिकाला मिळू शकेल. घरप˜ी लागू करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, बांधकाम परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे, कोणती मंजुरी किती दिवसांत मिळणार अशी नगररचना, पाणीपुरवठा, घरप˜ी आणि पाणीप˜ी, अग्निशमन विभाग अशा सुमारे १४ विभागांची माहिती या हेल्पलाइनवर उपलब्ध होणार आहे. हेल्पलाइनसाठी कॉलसेंटरमध्ये काम केल्याचा अनुभव असणार्‍या युवकांना संधी देण्यात येणार असून, त्यांना प्रशिक्षणदेखील देण्यात येणार आहे. पालिकेत सध्या पूर्णवेळ आयुक्त नसून ते उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष हेल्पलाइन सुरू होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Awaiting the new Commissioner's helpline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.