शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
2
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
3
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
5
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
6
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
7
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
9
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
10
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
12
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
14
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
15
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
16
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
17
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
18
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
19
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
20
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर

दुष्काळ अनुदानाची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 10:01 PM

सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या लक्ष्मणपूर या गावातील शेतकरी अद्यापही सन २०१८-१९ वर्षाच्या दुष्काळी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत तहसीलदार, तलाठी यांच्याकडे वारंवार लेखी व तोंडी तक्र ार करूनदेखील यावर कुठलीही कारवाई झाली नसून महसूल विभागाच्या ढिसाळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचा आरोप सरपंच लता कारले, उपसरपंच भाऊसाहेब जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा सावळा गोंधळ : तहसीलदारांकडे तक्र ारी करूनही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्यातील पूर्व भागाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या लक्ष्मणपूर या गावातील शेतकरी अद्यापही सन २०१८-१९ वर्षाच्या दुष्काळी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत तहसीलदार, तलाठी यांच्याकडे वारंवार लेखी व तोंडी तक्र ार करूनदेखील यावर कुठलीही कारवाई झाली नसून महसूल विभागाच्या ढिसाळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचा आरोप सरपंच लता कारले, उपसरपंच भाऊसाहेब जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे.गतवर्षी राज्यभरात मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता. या दुष्काळाची सर्वात जास्त झळ सिन्नर तालुक्याला बसली. दरम्यान २०१८-१९ या आर्थिक वर्षातील दुष्काळी भागातील शेतºयांना दिलासा देण्यासाठी दुष्काळ जाहीर झालेल्या गावांतील शेतकºयांना खरीप आणि रब्बीसाठी हेक्टरी सात तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली होती. यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाकडे संबंधित गावांचा निधी दिला होता. निधी वाटप सुरू असताना लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही काळ निधीचे वाटप थांबविण्यात आले होते. निवडणुकीनंतर पुन्हा वाटप सुरू करण्यात आले.मात्र, सर्वत्र शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा होत असताना तालु्क्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या लक्ष्मणपूरच्या शेतकºयांना अद्यापही दुष्काळी अनुदान प्राप्त झालेले नाही. याबाबत शेतकºयांच्या तक्रारी आल्यानंतर ग्रामंचायतीच्या वतीने तहसीलदार राहुल कोताडे यांना सबंधित निधी शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात यावा, अशा मागणीचे पत्र देण्यात आले होते. तसेच कामगार तलाठी यांच्याकडे सर्व खातेदार शेतकºयांची माहिती जमा करण्यात आली आहे, मात्र तरीदेखील संबंधित शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याचा आरोप सरपंच लता कारले, भाऊसाहेब जाधव यांनी केला आहे. महसूल विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका शेतकºयांना बसत असून, अनुदान खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अन्यथा सर्व शेतकरी मिळून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.वर्ष उलटूनदेखील लक्ष्मणपूरच्या शेतकºयांना सन २०१८-१९ वर्षाचे दुष्काळी अनुदान अद्याप मिळालेले नाही. याबाबत तहसीलदारांकडे विचारणा केली असता शासनाकडून आलेले अनुदान संपले असल्याचे तोंडी उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले. मात्र, प्रत्येक गावातील शेतकºयांच्या यादीप्रमाणे शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान काही गावांना वाटप न करताच संपले कसे?, यावरून महसूल विभाग दुष्काळाचा सामना केलेल्या शेतकºयांप्रति संवेदनशील नसल्याचे दिसून येते.- भाऊसाहेब जाधव, उपसरपंच, लक्ष्मणपूर

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी