शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गर्दी टाळा, कोरोनाचे वाहक बनू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 00:19 IST

नाशिक : कोरोनाची लागण होऊ नये यासाठी शासनाकडून दि. २२ मार्च रोजी ‘पब्लिक कर्फ्यू’ जाहीर केला तरी आज बरेचसे नागरिक बाहेर होते. सूचनांचे पालन करीत नाहीत. ‘मला काही होत नाही, मला काही झालं नाही’, असे न म्हणता गर्दीत जाणे टाळा आणि कोरोनाचे वाहक बनू नका असे कळकळीचे आवाहन मूळच्या निफाड तालुक्यातील व सध्या इटलीस्थित अभिषेक डेरले या युवकाने केले आहे.

ठळक मुद्देव्हिडीओ व्हायरल : निफाडच्या युवकाचे इटलीतून कळकळीचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाची लागण होऊ नये यासाठी शासनाकडून दि. २२ मार्च रोजी ‘पब्लिक कर्फ्यू’ जाहीर केला तरी आज बरेचसे नागरिक बाहेर होते. सूचनांचे पालन करीत नाहीत. ‘मला काही होत नाही, मला काही झालं नाही’, असे न म्हणता गर्दीत जाणे टाळा आणि कोरोनाचे वाहक बनू नका असे कळकळीचे आवाहन मूळच्या निफाड तालुक्यातील व सध्या इटलीस्थित अभिषेक डेरले या युवकाने केले आहे.अभिषेक हा निफाड येथील रहिवाशी असून, सध्या तो इटलीतील तुरीन प्रांतात स्थायिक झालेला आहे. तेथे तो ‘मॉलिक्युलर बायोटेक्नॉलॉजी’ या विषयावर पीएच.डी. करीत आहे. इटलीत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला असून, सद्यस्थिती त्याने जवळून अनुभवलेली आहे. कोरोनाची पाळेमुळे हळूहळू सर्वत्र पसरत असून, त्याची झळ भारतालाही बसू लागली आहे. सध्या भारत कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यावर असल्याने अभिषेकने सोशल मीडियाच्या माध्यमावर एक व्हिडीओ बनवून चिंता व्यक्त केली आहे.भारतातील जनतेने केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येक सूचनेचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असून, गर्दीत जाणे टाळायला हवे. कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत असल्यास समोरच्या व्यक्तीपासून सहा ते सात फुटाचे अंतर राखावे आणि आपले हात खिशातच ठेवावेत. कारण व्हायरसचा प्रसार करण्यात हात हेच प्रसारमाध्यम असल्याचे सांगून प्रत्येकाने काळजी घ्यावी,असे आवाहन अभिषेक डेरले याने केले आहे.मागील काही आठवड्यांपासून मी इटलीमधील कोरोना व्हायरसची स्थिती बघत आलो आहे. इटलीमधील केसेस दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्याचे मूळ कारण म्हणजे जनतेने केलेला निष्काळजीपणा. कोरोना व्हायरस स्टेज वन आणि स्टेज टूमध्ये असताना इटालियन सरकारने जनतेला गर्दीमध्ये जाणे टाळा अशा बºयाच सूचना देऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्याचे दुष्परिणाम पहावयास मिळत आहेत. इटलीप्रमाणे भारत आज स्टेज टू असून, जनतेने शासनाच्या सूचनांचे पालन करून गर्दीत जाणे टाळले पाहिजे.- अभिषेक डेरले, तुरीन, इटली

टॅग्स :Healthआरोग्यStudentविद्यार्थी