शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

ओझरच्या समस्यांबाबत नगरपरिषदेस लावले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 23:19 IST

ओझर : येथील शिवसेना, युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेत नगरपरिषदेस टाळे लावून आंदोलन छेडण्यात आले. शिवसेनेने नगरपरिषदेसमोर कचरा भरलेल्या गोण्या, रिकामे हंडे, बंद फ्लड लाईट ठेवून लक्षवेधी आंदोलन केले.

ठळक मुद्देप्रशासनाविरोधात मुख्य द्वारावरच शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

ओझर : येथील शिवसेना, युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेत नगरपरिषदेस टाळे लावून आंदोलन छेडण्यात आले. शिवसेनेने नगरपरिषदेसमोर कचरा भरलेल्या गोण्या, रिकामे हंडे, बंद फ्लड लाईट ठेवून लक्षवेधी आंदोलन केले.यात जोपर्यंत ओझर नगरपरिषद तथा निफाड तहसीलदार शरद घोरपडे हे नगरपरिषदेत येणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा शिवसेनेच्यावतीने घेण्यात आला. याआधी २८ फेब्रुवारी रोजी यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात येऊन तीन दिवसांचा अवधी देण्यात आला होता. परंतु नगरपरिषद प्रशासनाने कुठलाही निर्णय न घेतल्याने हे आंदोलन केल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले.येथील शहरात व उपनगरांत वाढलेल्या कचऱ्याचे ढिग, त्यामुळे पसरणारा दुर्गंध, अनियमित व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, अनेक दिवसांचे बंद अवस्थेतील पथदिवे, सार्वजनिक स्वच्छता ठिकाणे, शौचालय, बंद अवस्थेतील घंटागाडी आदी मूलभूत सुविधा नागरिकांना मिळत नसून नागरिकांचे या सुविधांअभावी प्रचंड हाल होत आहेत. परंतु याकडे नगरपरिषद प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा आरोप शिवसेना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. प्रशासक नगरपरिषदमध्ये हजर राहत नसल्याने अनेक समस्या उद्भवल्याने त्यास नगरपरिषद प्रशासन जबाबदार असून त्यांना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषद येथे येण्यासाठी आग्रही भूमिका घेत आंदोलन सुरू केले. यावेळी नगरपरिषदेमधील संपूर्ण कामकाज बंद ठेवून नगरपरिषदेस टाळे लावण्यात आले.यावेळी प्रदीप अहिरे, सुनील कदम, प्रकाश महाले, प्रशांत पगार, नितीन काळे, प्रकाश कडाळे, आशिष शिंदे, कामेश शिंदे, नितीन जाधव, आंनद खैरे, संजय कुऱ्हाडे, दिपक सोनार, ताराबाई वाघले, धर्मेंद्र जाधव, संजय पगार, संतोष कदम, सुरज शेलार, सागर शिंदे, गुणेंद्र तांबट, महेश शेजवळ, दीपक कदम, राहुल आहिरे, अन्सार कुरेशी, शरीफ खाटीक, असलम शेख, शब्बीर खाटीक, अनिल सोमासे, ओंकार शिंदे, सुनील चौधरी, प्रणित कदम, सुमित शिरसाठ, आकाश भवर, मोसीन पठाण, दयानंद अहिरे, अमित कोळपकर आदी उपस्थित होते.ओझर शहर व उपनगरांची अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच सार्वजनिक शौचालयांची परिस्थिती दयनीय झाली असून अनियमित पाणीपुरवठा याने महिलांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. या सर्व कचाट्यातून ओझरकरांची प्रशासनाने लवकरात लवकर मुक्तता करावी अन्यथा याहून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- नितीन काळे, शिवसेना शहरप्रमुख, ओझर. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतShiv Senaशिवसेना