सायबर सुरक्षेसाठी इंटरनेटचा गैरवापर टाळा

By Admin | Updated: February 7, 2017 23:05 IST2017-02-07T23:05:21+5:302017-02-07T23:05:36+5:30

चौधरी : सीएमसीएसमध्ये चर्चासत्र

Avoid Internet misuse for cyber security | सायबर सुरक्षेसाठी इंटरनेटचा गैरवापर टाळा

सायबर सुरक्षेसाठी इंटरनेटचा गैरवापर टाळा

नाशिक : मोबाइल, संगणक, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर आदि तंत्रज्ञान समाजमाध्यमांचा वापर वाढला आहे; मात्र ही साधने वापरताना कधी नकळत, तर कधी जाणूनबुजून आपल्या हातून एखादी बेकायदा कृती घडते. ती कृती ही कायद्याचे उल्लंघन करणारी असते. म्हणजे सायबर गुन्हा आपण केलेला असतो. पोलीस जेव्हा आपल्या दारात उभे राहतात, तेव्हा आपल्याला आपण सायबर गुन्हा केल्याचे कळते. त्यामुळे सायबरविश्वात वावरताना विशेष काळजी घेताना इंटनेटचा गैरवापर टाळणे हा सायबर सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय असल्याचे प्रतिपादन कर्नल विक्रम चौधरी यांनी केले. वाणिज्य, व्यवस्थापन आणि संगणकीय विज्ञान (सीएमसीएस) महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या दोन दिवसीय संयुक्त कार्यशाळेत ‘सायबर सिक्युरिटी एवरीवन्स नीड’ विषयावर ते बोलत होते.  कार्यशाळेचे उद्घाटन अ‍ॅड. ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास होळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रथम सत्रात कर्नल चौधरी यांनी उपस्थिताना संबोधित करताना सायबर क्र ाईमविषयी माहिती दिली. समाजामध्ये सायबर गुन्हे कशाप्रकारे घडतात, सायबर क्राइमपासून कशाप्रकारे बचाव करावा, यासाठी सायबर सिक्युरिटी कशी महत्त्वपूर्ण ठरते याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळे सायबर सिक्युरिटीची गरज व महत्वही त्यांनी यावेळी विषद केले. द्वितीय सत्रात डॉ. चित्रा देसाई यांनी ‘कॉन्टम क्रि पटोग्राफी’ विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे, व्यवस्थापन समिती सदस्य रंजना पाटील, समन्वयक प्रा. ज्ञानेश्वर आहेर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Avoid Internet misuse for cyber security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.