मुद्रा कर्ज प्रकरणांसाठी बँकांक डून टाळाटाळ
By Admin | Updated: February 4, 2016 22:34 IST2016-02-04T22:26:23+5:302016-02-04T22:34:57+5:30
मुद्रा कर्ज प्रकरणांसाठी बँकांक डून टाळाटाळ

मुद्रा कर्ज प्रकरणांसाठी बँकांक डून टाळाटाळ
ब्राह्मणगाव : नवीन स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या मुद्रा कर्ज योजनेला बॅँकांकडूनच हरताळ फासला जात असून, तरुणांना कर्ज देण्याचे टाळले जात असल्याचा आरोप बेरोजगारांनी केला आहे.
अनेक लहान-मोठे व्यावसायिक व्यवसाय वृद्धीसाठी व नवीन
व्यवसाय चालू करण्यासाठी भांडवलासाठी मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्जासाठी बँकांमध्ये चकरा मारत आहेत. बँकेत शाखाधिकारी आधी ग्राहकाला माहिती देण्यास टाळाटाळ करतात. नंतर कर्ज देण्यास
तयार झालेच तर व्यावसायिक परिस्थिती वा मागणी लक्षात
न घेता मुद्रा कर्जाअंतर्गत शिशु कर्ज .मर्यादा आहे ते पन्नास हजार रुपये कर्ज देण्याचे आश्वासन देतात. आजच्या परिस्थितीत ५० हजारात कोणताही व्यवसाय सुरू करता नसल्याने या विचारात तो व्यावसायिक कर्ज घेण्याचा नादच सोडून देत आहेत.
(वार्ताहर)