सरासरी पाऊसमान अद्यापही कमीच

By Admin | Updated: September 4, 2014 00:05 IST2014-09-04T00:00:06+5:302014-09-04T00:05:20+5:30

सरासरी पाऊसमान अद्यापही कमीच

The average rainfall is still low | सरासरी पाऊसमान अद्यापही कमीच

सरासरी पाऊसमान अद्यापही कमीच




नाशिक : मागील वर्षाच्या तुलनेत सप्टेंबर उजाडूनही अद्याप पावसाने अपेक्षित सरासरी गाठली नसून, ३ सप्टेंबर २०१३ ला पावसाने सरासरीच्या ८४.६९ टक्के हजेरी लावली होती, ती यंदाच्या वर्षी अद्याप ६८. १० इतकीच राहिली आहे. गेल्या चोवीस तासांत झालेल्या १०५ मिलिमीटर पावसाच्या नोंदीत मात्र इगतपुरी तालुक्याने ६३ मिलिमिटर म्हणजे सर्वाधिक हजेरी लावली आहे.
यंदाच्या मोसमात संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पूर्वाधातही पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. जिल्ह्णात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. जुलैच्या उत्तरार्धात व संपूर्ण आॅगस्टमध्ये मात्र पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्यांना वेग येऊन जिल्ह्णातील जवळपास ६ लाख ४० हजार ६०० हेक्टर क्षेत्रापैकी ५ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावरील (८२.६८ टक्के) खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. तसेच जिल्ह्णातील वाघाड, भावली, वालदेवी, आळंदी, हरणबारी व केळझर ही धरणे शंभर टक्के तर शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ९२ टक्के, तसेच नांदूरमध्यमेश्वर-९५, भोजापूर-९८, चणकापूर-९० या धरणांमध्येही ९० टक्क्याच्या आसपास पाणीसाठा झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The average rainfall is still low