नाशिक, मालेगावने सरासरी ओलांडली

By Admin | Updated: June 24, 2015 01:52 IST2015-06-24T01:50:52+5:302015-06-24T01:52:05+5:30

नाशिक, मालेगावने सरासरी ओलांडली

Average exceeded by Nashik, Malegaon | नाशिक, मालेगावने सरासरी ओलांडली

नाशिक, मालेगावने सरासरी ओलांडली

 नाशिक : उशिराने का होईना आगमन झालेल्या पावसाने जिल्'ात सर्वदूर हजेरी लावल्यामुळे जून महिन्याच्या एकूण सरासरीच्या सुमारे ९६ टक्के पाऊस गेल्या दोन दिवसांत नोंदविला गेला असून, नाशिक व मालेगाव या दोन तालुक्यांनी जून महिन्याची सरासरी ओलांडल्याने शेतकऱ्यांच्या शेती कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच दरम्यान जिल्'ात फक्त २८ टक्के सरासरी पावसाची नोंद झाली होती. जून महिन्याची जिल्'ाची सरासरी १५४.९७ मिलिमीटर इतकी आहे. गेल्या दोन दिवसांत ९६.५ मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या चोवीस तासांत जिल्'ात २४२.५ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. त्यात सर्वाधिक पाऊस इगतपुरी (६२) इतका असून, त्या खालोखाल नाशिक (२३) मिलिमीटर पाऊस झाला. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबक तालुक्याकडे अजूनही पावसाची वक्रदृष्टी आहे. त्र्यंबक तालुक्याची जून महिन्याची सरासरी २६०.५० मिलिमीटर असून, आजपावेतो १४५ मिलिमीटर म्हणजेच निम्माच पाऊस झाला आहे. त्यामानाने नाशिकच्या ९३.५० मिलिमीटर सरासरीच्या तुलनेत आजपर्यंत ९२.२ मिलिमीटर पाऊस झाला, तर मालेगाव तालुक्याची १०२ मिलिमीटरची सरासरी ओलांडून तेथे १४३ मिलिमीटर इतकी नोंद करण्यात आली आहे. संपूर्ण पावसाळ्याच्या एकूण टक्केवारीच्या प्रमाणात जिल्'ात ९ टक्के पाऊस गेल्या दोन ते तीन दिवसांत नोंदविण्यात आला. गेल्या वर्षी हीच परिस्थिती जेमतेम तीन टक्क्यावर होती. इगतपुरी, पेठ व सुरगाणा या तीन तालुक्यांपैकी पेठ वगळता इगतपुरी व सुरगाण्यात समाधानकारक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात आवणीला सुरुवात केली असून, अजून आठ ते दहा दिवस अशाच पावसाची प्रतीक्षा आहे. तर उर्वरित जिल्'ात शेतकऱ्यांनी अगोदरच मशागत करून ठेवलेल्या जमिनीने पावसामुळे वाफा घेण्यास सुरुवात केली असून, हा पाऊस आणखी आठवडाभर चालला तर तत्काळ पेरण्यांना सुरुवात केली जाणार आहे.

Web Title: Average exceeded by Nashik, Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.