Avelia's unique 'Goseva' in Malegaon | मालेगाव येथील अवलियाची अनोखी ‘गोसेवा’

मालेगाव येथील अवलियाची अनोखी ‘गोसेवा’

ठळक मुद्देगोशाळेचा उपक्रम : जादा पैसे मोजून जीवनदान; अनेकांना मिळाला रोजगार

शफीक शेख ।
मालेगाव : नेहमीच दुष्काळ आणि दारिद्र्याने पिचलेला शेतकरी आपली आर्थिक घडी सावरण्यासाठी मार्ग शोधत असतो. त्यातून भाकड आणि वृद्ध झालेली जनावरे सांभाळण्यापेक्षा ती विकून पैसे मिळविण्यासाठी मिळेल त्या भावात विकत असतो. अशा विक्री केल्या जाणाऱ्या जनावरांना अधिक भाव देऊन गो-धन वाचविण्याचे काम शहरातील सामाजिक कार्यकर्ते विनोद कुचेरिया करीत आहेत.
कुचेरिया यांनी तालुक्यातील गिगावजवळ शेती विकत घेतली असून, त्यात गोरक्षणासाठी गोशाळा उभारण्यात येत आहे. गोरक्षकांनी मदत करावी. अशी त्यांची अपेक्षा आहे. सकाळी ७ वाजता विनोद कुचेरिया गायींना हिरवा चारा खाऊ घालतात. त्यानंतर त्यांचा व्यवसाय सुरू होतो. गोमातेस वाचवून तिला जीवनदान द्यावे व तिची सेवा करावी या उद्देशाने गोशाळा स्थापन केल्याचे कुचेरिया यांनी सांगितले. याकामी कृषिमंत्री दादा भुसे, सुनील गायकवाड, मदन गायकवाड यांंचे सहकार्य लाभत आहे.
कुचेरिया यांनी आजपर्यंत सुमारे २७ गायींना जीवदान दिले असून, स्वखर्चाने त्यांचा सांभाळ करीत आहेत. कुचेरिया यांना आपण गो रक्षणासाठी काय करू शकतो. त्यातून स्वत:च्या खर्चाने रोज कुचेरिया गायींना ढेप, हिरवा चारा आणून त्यांना खाऊ घालतात. यासाठी त्यांना दररोज सरासरी तीन हजार रुपये खर्च येतो. गायींची व्यवस्था पाहण्यासाठी काम करणाºया तिघांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यामुळे अनेकांच्या चुली पेटल्याचे समाधानही कुचेरिया यांना मिळते.

Web Title: Avelia's unique 'Goseva' in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.